- News
- सिटी क्राईम
- पत्नीच्या डोळ्यावर मोबाइल फेकून मारल्याने गंभीर दुखापत, पतीविरुद्ध गुन्हा दाखल, वाळूजची घटना
पत्नीच्या डोळ्यावर मोबाइल फेकून मारल्याने गंभीर दुखापत, पतीविरुद्ध गुन्हा दाखल, वाळूजची घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : उधारी फेडण्यासाठी माहेरावरून पैसे आण, असे म्हणून पतीने ३१ वर्षीय विवाहितेच्या डोळ्यावर मोबाइल फेकून मारत गंभीर दुखापत केल्याची घटना वाळूजच्या गणेश कॉलनीत समोर आली आहे. विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध बुधवारी (११ डिसेंबर) गुन्हा दाखल केला आहे. कल्पना संजय शिंदे (वय ३१, रा. गणेश कॉलनी, वाळूज) यांनी या प्रकरणात तक्रार […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : उधारी फेडण्यासाठी माहेरावरून पैसे आण, असे म्हणून पतीने ३१ वर्षीय विवाहितेच्या डोळ्यावर मोबाइल फेकून मारत गंभीर दुखापत केल्याची घटना वाळूजच्या गणेश कॉलनीत समोर आली आहे. विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध बुधवारी (११ डिसेंबर) गुन्हा दाखल केला आहे.
११ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ९ च्या सुमारास कल्पना या घरात स्वयंपाक करत असताना पती संजय दारू पिऊन आला. मला लोकांचे उधार घेतलेले पैसे द्यायचे आहेत. तू तुझ्या आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये, असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली. नंतर खिशातील मोबाइल जमिनीवर फेकून फोडला व तोच मोबाइल कल्पना यांच्या डोळ्यावर जोराने मारला. त्यामुळे कल्पना यांच्या उजव्या डोळ्याजवळ जखम झाली. रक्त निघून लागले. संजय घरातून निघून गेला. कल्पना यांनी वाळूज पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवले. अधिक तपास पोलीस अंमलदार किरण जाधव करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

