पत्‍नीच्या खूनप्रकरणी पतीला आजन्म कारावास!; विशालनगरात घडली होती घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पत्‍नीच्या खूनप्रकरणी सचिन सीताराम वायचाळ (वय ३५, रा. विशालनगर, गारखेडा परिसर) याला सत्र न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांनी आजन्म कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. त्‍याच्या मारहाणीत पत्नी मंगलचा मृत्यू झाला होता. मंगलचे वडील उद्धव सोनुने (वय ५०, रा. देऊळगाव वायसा, पो. जांबुल, ता. लोणार, जि. बुलडाणा) यांनी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पत्‍नीच्या खूनप्रकरणी सचिन सीताराम वायचाळ (वय ३५, रा. विशालनगर, गारखेडा परिसर) याला सत्र न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांनी आजन्म कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. त्‍याच्या मारहाणीत पत्नी मंगलचा मृत्यू झाला होता.

मंगलचे वडील उद्धव सोनुने (वय ५०, रा. देऊळगाव वायसा, पो. जांबुल, ता. लोणार, जि. बुलडाणा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली होती. २०१० मध्ये हॉटेलमध्ये काम करणाऱ्या प्रदीप जैन याच्याशी त्यांची ओळख झाली होती. त्याने त्याचा मेहुणा सचिन वायचाळ याच्याशी मंगलचे लग्न लावण्याची मागणी केली. त्यानंतर मंगल आणि सचिनचे लग्न झाले. त्यांना दोन मुले झाली.

सचिन खासगी कंपनीत काम करत होता. मात्र त्याला दारूचे व्यसन होते. मंगलला मारहाण करायचा. ३ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी सचिनच्या मारहाणीत मंगलचा मृत्‍यू झाला. तिच्या अंगावरील मारहाणीचे वळ बघून उद्धव सोनुने यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सुनावणीत आठ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. सुनावणीअंती न्यायालयाने सचिन वायचाळ याला शिक्षा सुनावली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software