पतीच्या मित्राची ३२ वर्षीय महिलेवर वाईट नजर, घरात एकटी पाहून अश्लील कृत्‍य करत असतानाच पती घरी आला अन्‌ वाचली इज्‍जत !; वाळूज MIDC तील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीच्या मित्राची ३२ वर्षीय विवाहितेवर वाईट नजर पडली. घरात तिला एकटी पाहून त्‍याने अश्लील चाळे करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्‍न केला. त्‍याचवेळी तिचा पती घरी आला. ते पाहून त्‍याने पळ काढला. ही घटना वाळूज एमआयडीसीत गुरुवारी (१४ नोव्‍हेंबर) सायंकाळी घडली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अनिल कर्डीले या युवकाविरुद्ध गुन्हा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीच्या मित्राची ३२ वर्षीय विवाहितेवर वाईट नजर पडली. घरात तिला एकटी पाहून त्‍याने अश्लील चाळे करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्‍न केला. त्‍याचवेळी तिचा पती घरी आला. ते पाहून त्‍याने पळ काढला. ही घटना वाळूज एमआयडीसीत गुरुवारी (१४ नोव्‍हेंबर) सायंकाळी घडली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अनिल कर्डीले या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला पती, दोन मुलांसह राहते. संशयित अनिल तिच्या पतीचा मित्र आहे. तो अधूनमधून त्‍यांच्या घरी येत होता. यादरम्‍यान त्‍याची वाईट नजर महिलेवर पडली. तो तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. लगट करत असल्याने त्‍याचा उद्देश ओळखून विवाहितेने त्‍याला यापूर्वीच बजावले होते. मात्र तरीही तो वारंवार तिच्या अंगलट येत होता. ही बाब विवाहितेने पतीला सांगितल्यानंतर तिच्या पतीने त्‍याला जाब विचारला. त्‍यानंतर तो तिच्या घरी बरेच दिवस आला नव्हता.

गुरुवारी सायंकाळी ती घरात एकटी होती. त्‍याचवेळी अनिल तिच्याकडे आला. घरात घुसून तिच्यासोबत अश्लील चाळे सुरू लागला. तिने विरोध केला असता तू आरडाओरड केलीस तर तुझ्या पती व मुलांना जीवे मारेल, अशी धमकी त्‍याने दिली आणि बलात्‍काराचा प्रयत्‍न करू लागला. दोघांत झटापट सुरू असतानाच तिचा पती घरी आला. समोरील दृश्य पाहून तो हादरला. तिचा पती आल्याचे पाहून अनिलने तिथून पळ काढला. त्‍यानंतर महिलेने पतीसोबत येऊन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अनिलविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस अंमलदार जी. के. कोंडके करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software