पडेगावची चर्च फोडली कुणी? ५ जणांची नावे आली समोर!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पडेगावच्या चिनार गार्डनजवळील सेंटमेरी ऑर्थोडॉक्स चर्च पाच जणांनी फोडून कपाटातील ९८ हजार ७२० रुपये चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंगळवारी (१० सप्‍टेंबर) चर्चचे खजिनदार बाबू मॅथू सी (वय ४७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाबू मॅथू सी हे चर्चचे कस्टोडीयन आहेत. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पडेगावच्या चिनार गार्डनजवळील सेंटमेरी ऑर्थोडॉक्स चर्च पाच जणांनी फोडून कपाटातील ९८ हजार ७२० रुपये चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंगळवारी (१० सप्‍टेंबर) चर्चचे खजिनदार बाबू मॅथू सी (वय ४७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बाबू मॅथू सी हे चर्चचे कस्टोडीयन आहेत. चर्चच्या पैशांचा व्यवहार सांभाळतात. कॅश पेटीची एक चावी त्यांच्याकडे व एक फादरकडे असते. एम.जी. स्कारीया, सज्जी जॉर्ज, लिंटू थॉमस, सी. बी. अॅलेक्स, यईया खान हे चर्चमध्ये आले. उत्तर बाजूचे दोन दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. नंतर दक्षिण बाजूचा दरवाजा उघडण्यासाठी गेले. तो दरवाजासुध्दा उघडला नाही. त्यांनी अल्तार जवळच्या रूमचा छोटा दरवाजा तोडला. तेथून एका दुसऱ्या रुममध्ये गेले व तेथे ठेवलेले कपाट तोडले. तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software