- News
- सिटी क्राईम
- नीटची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय मुलीवर प्रियकराचा तिनदा बलात्कार!; २२ वर्षीय तरुणाला अटक, वाळूज MIDC
नीटची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय मुलीवर प्रियकराचा तिनदा बलात्कार!; २२ वर्षीय तरुणाला अटक, वाळूज MIDC तील खळबळजनक घटना
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २२ वर्षीय तरुणाने १७ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली. सतत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत असल्याने अखेर तिने तिच्या मामाला हा प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांसह वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन तिने प्रियकराविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी संशयित करण चव्हाण (रा. वाळूज महानगर परिसर) याच्याविरुद्ध […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २२ वर्षीय तरुणाने १७ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली. सतत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत असल्याने अखेर तिने तिच्या मामाला हा प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांसह वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन तिने प्रियकराविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी संशयित करण चव्हाण (रा. वाळूज महानगर परिसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तातडीने त्याला अटक केली आहे. या घटनेने वाळूज एमआयडीसीत खळबळ उडाली आहे.
नारळीबागमध्ये महिलेसमोर केली लघुशंका!
मनीष राजू पंडुरे (रा. नारळीबाग) याने घरासमोर दरवाजात बसलेल्या महिलेकडे येऊन अश्लील चाळे सुरू केले. तिच्यासमोर त्याने लघुशंकाही केली. ही घटना १६ सप्टेंबरला दुपारी साडेचारच्या सुमारास नारळीबाग परिसरात घडली. महिलेच्या तक्रारीवरून मनीषविरुद्ध सिटीचौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पैठणमध्ये अल्पवयीन मुलीचा वाईट हेतूने हात धरला…
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : अल्पवयीन मुलीचा वाईट हेतूने हात धरून घराबाहेर ओढणाऱ्या तरुणाविरुद्ध बुधवारी (१८ सप्टेंबर) पैठण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक कडूबा जाधव (रा. लक्ष्मीनगर, पैठण) असे संशयित तरुणाचे नाव आहे. त्याने तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला वाईट हेतूने हात धरून घराबाहेर ओढले. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी पैठण पोलिसांत तक्रार दिली.
महिलांकडून तरुणाला चोप
नीलेश रमेश नाडे (वय २४, निसर्ग कॉलनी, भावसिंगपुरा) याने भावसिंगपुऱ्यातील लालमाती परिसरात उभ्या तीन महिलांना मित्राबाबत विचारणा केल्यानंतर आम्हाला तुझ्या मित्राबाबत का विचारतो, असे म्हणत तिन्ही महिलांनी नीलेशला शिवीगाळ करून लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. ही घटना १५ सप्टेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता घडली. नीलेश लालमाती परिसरात उभा होता. त्या ठिकाणी तीन महिलाही उभ्या होत्या. नीलेशने त्यांना त्याच्या मित्राबाबत विचारणा केली. त्यानंतर महिलांनी संतप्त होत त्याला मारहाण केली. नीलेशच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या तिन्ही महिलांविरोधात छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

