निळा टी-शर्ट, तोंडाला रुमाल बांधलेला तो CCTV त झालाय कैद…!; प्रयत्‍न केले पण अन्‌ वैतागून निघून गेला…चिकलठाण्यात घडलाय हा प्रकार…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्‍न केला, पण त्‍याला जमलंच नाही. वैतागून तो निघून गेला… पण त्‍याचा हा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ३७ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी (२५ जून) गुन्हा दाखल केला आहे. मोहिनी युवराज देशमुख (रा. मायवर्ल्ड, चिकलठाणा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्‍न केला, पण त्‍याला जमलंच नाही. वैतागून तो निघून गेला… पण त्‍याचा हा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ३७ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी (२५ जून) गुन्हा दाखल केला आहे.

मोहिनी युवराज देशमुख (रा. मायवर्ल्ड, चिकलठाणा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍या प्रोफेसर आहेत. त्यांचे पती मुंबई येथिल सिपला कंपनीत जॉब करतात. १० जूनला सकाळी नऊला त्‍या घराला कुलूप लावून नोकरीवर गेल्या. सायंकाळी पावणेसहाला परतल्या असता सेफ्टी दरवाजाचा लोखंडी रॉड तोडून बाहेरील दरवाजा जबरदस्तीने उघडलेला होता. घराच्या दरवाजाची अवस्था बघितली असता त्यांच्या लक्षात आले की, कोणीतरी घराचा दरवाजा चोरीच्या हेतूने तोडून घरात घुसण्याचा प्रयत्‍न केला.

मोहिनी देशमुख यांनी घरात पाहणी केली असता सर्व सामान सुस्थितीत होते. घरातील कोणत्याही सामानाची चोरी झालेली नाही. त्यानंतर २३ जूनला सोसायटीतील कॅमेरा त्यांनी चेक केला असता, एक अनोळखी निळा टी शर्ट घातलेला, तोंडाला पांढरा रुमाल बांधलेला व्यक्ती त्यांच्या सोसायटीत संशयितरित्या फिरताना दिसला. त्यामुळे घरातही त्यानेच चोरीचा प्रयत्न केल्याची मोहिनी देशमुख यांची खात्री झाली. त्यांनी मंगळवारी सिडकाे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार बापूराव बावस्कर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software