नाशिकहून दुचाकी चोरून छ. संभाजीनगरात आणली, जवाहरनगर पोलिसांनी रोपळेकर चौकात पकडले

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नाशिक येथून मोटारसायकल चोरी करून छत्रपती संभाजीनगरला आणणाऱ्या चोरट्याला जवाहरनगर पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी (१६ डिसेंबर) दुपारी एकच्या सुमारास जेरबंद केले. त्‍याला पुढील तपासासाठी नाशिक पोलिसांच्या ताब्‍यात देण्यात आले आहे. सोमवारी दुपारी १ ला जवाहरनगर पोलिसांच्या विशेष पथकाचे पोलीस अंमलदार मारोती गोरे, मोफतलाल राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नाशिक येथून मोटारसायकल चोरी करून छत्रपती संभाजीनगरला आणणाऱ्या चोरट्याला जवाहरनगर पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी (१६ डिसेंबर) दुपारी एकच्या सुमारास जेरबंद केले. त्‍याला पुढील तपासासाठी नाशिक पोलिसांच्या ताब्‍यात देण्यात आले आहे.

सोमवारी दुपारी १ ला जवाहरनगर पोलिसांच्या विशेष पथकाचे पोलीस अंमलदार मारोती गोरे, मोफतलाल राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की रोपळेकर हॉस्पिटलजवळ एक जण चोरीची स्प्लेंडर मोटरसायकल घेऊन येणार आहे. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अतिश लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक मारोती खिल्लारे, पोलीस अंमलदार चंद्रकांत पोटे, पोलीस अंमलदार मारोती गोरे, मोफतलाल राठोड, विनोद बनकर यांनी रोपळेकर हॉस्पिटलजवळ सापळा रचून मोटारसायकल घेऊन प्रवीण रामभाऊ पाईकराव (वय ३२, रा. जुनी मुकुंदवाडी गाव, Avoin हॉटेलमागे, मुकुंदवाडी) येताच झडप घालून पकडले.

त्याने ही मोटरसायकल देवळाली नाशिक रोड येथील आठवडे बाजारातून चोरी केल्याची कबुली दिली. या मोटरसायकलीबाबत माहिती घेतली असता ती उपनगर पोलीस ठाणे, नाशिकच्या हद्दीतून चोरीला गेल्याची तक्रार अक्षय गौतम बोराडे (वय ३०, पिंपळगाव खांब ता. जि. नाशिक) यांनी दिलेली आढळली. संशयित चोरटा मोटारसायकलीसह पुढील तपासासाठी नाशिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुक्‍तेश्वर लाड यांच्या स्वाधीन करण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त नवनीत काँवत, सहायक पोलीस आयुक्त रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अतिश लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक मारोती खिल्लारे, पोलीस अंमलदार चंद्रकांत पोटे, पोलीस अंमलदार विनोद बनकर, मारोती गोरे, मोफतलाल राठोड यांनी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software