नाव तिचं सुरक्षा, वय २०… पण महिलांना करत होती ‘असुरक्षित’; हर्सूल टी पॉइंटवर काय कारनामा केला वाचा…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : तिचं नाव सुरक्षा इशारा चव्हाण (वय २०, रा. हसनाबाद, ता. भोकरदन, जि. जालना)…. छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूल टी पॉइंटवर तिला एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावताना इतर महिलांनी रंगेहात पकडले. महिलांनी तिला हर्सूल पोलिसांच्या ताब्‍यात दिले. तिने ३५ हजारांचे मंगळसूत्र तोडून पळण्याचा प्रयत्‍न केला होता… ही घटना सोमवारी (२८ ऑक्‍टोबर) दुपारी १२ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : तिचं नाव सुरक्षा इशारा चव्हाण (वय २०, रा. हसनाबाद, ता. भोकरदन, जि. जालना)…. छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूल टी पॉइंटवर तिला एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावताना इतर महिलांनी रंगेहात पकडले. महिलांनी तिला हर्सूल पोलिसांच्या ताब्‍यात दिले. तिने ३५ हजारांचे मंगळसूत्र तोडून पळण्याचा प्रयत्‍न केला होता… ही घटना सोमवारी (२८ ऑक्‍टोबर) दुपारी १२ च्या सुमारास घडली.

सुरक्षा हिच्याविरुद्ध आशा हेमंत काथार (वय ३३, रा. फुलंब्री) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, आशा काथार या मुलासह दीपावलीनिमित्त कपडे खरेदीसाठी छत्रपती संभाजीनगरला आल्या होत्‍या. खरेदी करून हर्सूल टी पॉइंटवर फुलंब्रीकडे जाण्यासाठी आल्या. एसटी बसमध्ये चढत असताना मागून सुरक्षा चव्हाण हिने त्‍यांचे मंगळसूत्र हिसकावून तोडून घेण्याचा प्रयत्‍न केला. मानेला झटका बसल्याने आशा काथार यांनी मागे वळून पाहिले असता बसमध्ये चढणाऱ्या इतर महिलांनी मंगळसूत्र तोडणाऱ्या सुरक्षा हिचे कृत्‍य पाहून लगेच पकडले. लोकांनी हर्सूल पोलीस ठाण्यात कॉल केला. पोलिसांनी हर्सूल टी पॉइंटवर येऊन सुरक्षाला ताब्‍यात घेतले. तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार पोपट दहिफळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software