धावत्या रिक्षात चालकाचे पॉलिटेक्‍निकच्‍या विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन!; छत्रपती संभाजीनगरातील संतापजनक घटना

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : धावत्या रिक्षात चालकाने पॉलिटेक्‍निकच्या विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केले. त्‍यामुळे घाबरून गेलेल्या तरुणीने आरडाओरड करत रिक्षा थांबवायला सांगितली. ती खाली उतरताच रिक्षाचालक पसार झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (२३ ऑगस्ट) सकाळी पावणेआठच्या सुमारास कोकणवाडी चौक परिसरात घडली. वेदांतनगर पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्‍यान, स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आला. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : धावत्या रिक्षात चालकाने पॉलिटेक्‍निकच्या विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केले. त्‍यामुळे घाबरून गेलेल्या तरुणीने आरडाओरड करत रिक्षा थांबवायला सांगितली. ती खाली उतरताच रिक्षाचालक पसार झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (२३ ऑगस्ट) सकाळी पावणेआठच्या सुमारास कोकणवाडी चौक परिसरात घडली. वेदांतनगर पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्‍यान, स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आला. कारण रिक्षा शोधण्यासाठी नंबरची गरज पडली, पण महावीर चौकसारख्या (बाबा पेट्रोलपंप) महत्त्वाच्या चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे चक्‍क बंद असल्याचे समोर आले. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी दुपारनंतर कॅमेरे सुरू केले. पोलिसांनीही पीडित विद्यार्थिनीची तक्रार लवकर घेतली नाही, असा आरोप नातेवाइकांनी केला. पोलिसांकडून अरेरावी झाल्याची तक्रार नातेवाइकांनी केली. राज्‍यात आधीच लैंगिक अत्‍याचाराच्या घटनांमुळे वातावरण पेटले असताना त्‍यात पोलिसांनी तरी किमान अशा प्रकरणात गांभीर्य दाखवायला हवे, अशा प्रतिक्रिया उमटल्या.

नक्की काय झाले?
१७ वर्षे ८ महिने वयाची पीडित विद्यार्थिनी वाळूज परिसरात राहते. ती पॉलिटेक्‍निक कॉलेजला येण्यासाठी महावीर चौकापर्यंत सिटी बसने येते. पुढे सीटर रिक्षाने कोकणवाडी चौकमार्गे कॉलेजला येते. शुक्रवारी सकाळी पावणेआठला ती महावीर चौकात उतरली. तिथून सीटर रिक्षात बसली. रिक्षात ती एकटीच होती. चालकाने रिक्षा पंचवटी चौकातून जय टॉवर्सकडे घेतली. बन्सीलालनगर येथे राणा हॉटेलसमोर आल्यावर त्याने तिच्याकडे पाहून अश्लील चाळे सुरू केले. त्‍यामुळे विद्यार्थिनी घाबरून गेली. तिने रिक्षा थांबवायला सांगितली असता त्‍याने जोरात पळवायला सुरुवात केली. त्‍यामुळे विद्यार्थिनीने आरडाओरड करत उडी मारणार असल्याचे सांगताच त्‍याने रिक्षा थांबवली. विद्यार्थिनी लगेच रिक्षातून उतरली. त्‍यानंतर रिक्षाचालक पसार झाला.

डोळ्याला काजळ होते, आधी पर्सनल गोष्टी सांगितल्या…
रिक्षाचालकाने अंगात ग्रे रंगाचा शर्ट घातलेला होता, डोळ्याला काजळ लावलेले होते. विद्यार्थिनीला तो आधी म्‍हणाला, की तुझ्या घरी किरकीर सुरू असते. भांडणे होत असता. तुझा एक पाय दुखतो, तुझ्या घरी पैशाची अडचण आहे. मी तुला मदत करू शकतो… हे ऐकून विद्यार्थिनी चक्रावली. तिने त्‍याला तुला कसे माहीत, असे म्‍हणून विचारणा केली असता त्‍याचे धाडस वाढून त्‍याने अश्लील कृत्‍य केले. विद्यार्थिनी इतकी घाबरली होती, तिला रिक्षाचा क्रमांकही पाहता अाला नाही. चेहरा मात्र ओळखू शकते.

विद्यार्थिनीने आधी घडलेला प्रकार कॉलेजच्या शिक्षिकेला सांगितले. त्यानंतर पालकांना कळवले. काही वेळातच शिक्षिका तिला घ्यायला गेल्या. पोलीस नियंत्रण कक्षाला त्‍यांनीच कळवले. पालकांनीही घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनी वेदांतनगर पोलीस ठाणे गाठले. विद्यार्थिनी अल्पवयीन असल्यामुळे विनयभंगासह पोक्सोच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेदांतनगर पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध सुरू केला आहे. शुक्रवारी दिवसभर अनेक रिक्षाचालकांकडे चौकशी झाली. सीसीटीव्ही तपासून रिक्षाचा नंबर मिळेल असे पोलिसांना वाटले पण महावीर चौकातील सीसीटीव्ही कॅमेरेच घटनेवेळी बंद होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी

Latest News

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागात एम. फार्मसी अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी...
आयआरसीटीसीच्या कन्फर्म तिकिटात नाव बदलायचे कसे?
सकाळ होईपर्यंत झोप येत नाही, कूस बदलत राहता? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं, देसी टॉनिक, येईल सुखाची झोप!
Beauty Feature : फिल्टरसारखा लूक तेही मेकअपमधून!; जाणून घ्या ब्लरिंग मेकअप, लग्नाच्या सिझनमध्ये खूप येईल कामी!!
नशेखोराचा कहर : आधी लिफ्ट मागितली, नंतर रस्‍त्‍यात गाडी थांबवून दारू पिण्यासाठी पैसे मागत १८ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, मनपा आयुक्‍तांच्या निवासस्थानाजवळील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software