- News
- सिटी क्राईम
- धक्कादायक… विमान प्रवासात महिला डॉक्टरला मागील सीटवर बसलेल्या कंपनी मॅनेजरकडून वारंवार बॅड टच!; तब्...
धक्कादायक… विमान प्रवासात महिला डॉक्टरला मागील सीटवर बसलेल्या कंपनी मॅनेजरकडून वारंवार बॅड टच!; तब्बल सहावेळा अश्लील स्पर्श केल्याची तक्रार, डॉक्टरच्या शर्टमध्ये हात घालायचा…
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : समोरच्या सीटवर बसलेल्या महिला डॉक्टरला वारंवार बॅड टच करून विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर विमानप्रवासात सोमवारी (२ सप्टेंबर) सायंकाळी सव्वा सहा ते साडेसहादरम्यान घडला. विशेष म्हणजे, अश्लील कृत्य वारंवार घडूनही डॉक्टर महिलेच्या तक्रारीवर कारवाई करताना सिडको एमआयडीसी पोलिसांनी संशयित आसीफ खान अन्वर अहमद (वय ३९, बारी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : समोरच्या सीटवर बसलेल्या महिला डॉक्टरला वारंवार बॅड टच करून विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर विमानप्रवासात सोमवारी (२ सप्टेंबर) सायंकाळी सव्वा सहा ते साडेसहादरम्यान घडला. विशेष म्हणजे, अश्लील कृत्य वारंवार घडूनही डॉक्टर महिलेच्या तक्रारीवर कारवाई करताना सिडको एमआयडीसी पोलिसांनी संशयित आसीफ खान अन्वर अहमद (वय ३९, बारी कॉलनी, रा. कटकट गेट) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला, पण प्राथमिक चौकशी करून पाच तासांतच नोटीस बजावून सोडले.
छत्रपती संभाजीनगरात गतिमंद मुलीसह महिलेची छेड…
पहिल्या घटनेत कपडे वाळवत घालताना चिमटा दुसऱ्याच्या दारात पडल्यानंतर तो घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन गतिमंद मुलीसोबत तरुणाने अश्लील चाळे केल्याची घटना २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्रिवेणीनगर सिडको एन-७ येथे घडली. प्रसंजित ठोंबरे असे विनयभंग करणाऱ्याचे नाव आहे. मुलीच्या आईने जाब विचारला असता वंदना ठोंबरे हिने शिवीगाळ करून धमकावले. पीडित मुलगी आईसह गच्चीवर कपडे वाळवत घालत होती. कपड्यांना लावायचा चिमटा दुसऱ्याच्या घरासमोर दारात पडला. तो घेण्यासाठी गतिमंद अल्पवयीन मुलगी गेली. ठोंबरे याने तिचा हात धरून जवळ ओढत अश्लील कृत्य केले. तिने घाबरून आरडाओरड केल्याने तिची आई धावून आली. तिने प्रसंजितला जाब विचारला असता वंदनाने दोघींना शिवीगाळ करून धमकावले. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत महिलेला पाहून अश्लील शेरेबाजी करणाऱ्या अंकुश आसाराम लोंढे (रा. फाजलपुरा, एसटी कॉलनी) याच्याविरुद्ध सिटी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १ सप्टेंबरला दुपारी साडेचार वाजता त्याने महिलेला पकडून अश्लील चाळे केले. अपहरण करण्याची धमकी दिली. त्याआधीही अनेक दिवसांपासून पाठलाग करत होता,असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

