धक्‍कादायक… आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलाची आत्‍महत्‍या, जयभवानीनगर हादरले!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन २ भागातील जयभवानीनगरात आठवीत शिकणाऱ्या मुलाने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (११ डिसेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास समोर आल्यानंतर खळबळ उडाली. आदित्य विनोद खंडारे (वय १३, रा. जयभवानीनगर) असे आत्‍महत्‍या केलेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील वाळूज येथील एका अनुदानित महाविद्यालयात ग्रंथालयशास्त्र विषयाचे कंत्राटी प्राध्यापक […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन २ भागातील जयभवानीनगरात आठवीत शिकणाऱ्या मुलाने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (११ डिसेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास समोर आल्यानंतर खळबळ उडाली.

आदित्य विनोद खंडारे (वय १३, रा. जयभवानीनगर) असे आत्‍महत्‍या केलेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील वाळूज येथील एका अनुदानित महाविद्यालयात ग्रंथालयशास्त्र विषयाचे कंत्राटी प्राध्यापक आहेत. आई खासगी कंपनीत नोकरीला आहे. आदित्य दोन दिवसांपासून शाळेत न जाता घरीच होता. त्‍याची मोठी बहीण हेमाक्षी ९ वीत आहे. दुपारी ती शाळेतून घरी आली तेव्हा आदित्य दरवाजा उघडत नसल्याने तिने खिडकीतून डोकावले असता आदित्य गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तिने आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले. त्‍याला तातडीने घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.

मात्र डॉक्‍टरांनी त्‍याला तपासून मृत घोषित केले. आदित्यचा ४ वर्षांचाच छोटा भाऊ प्रणीत याचा २ महिन्यांपूर्वी गंभीर आजाराने मृत्यू झाला होता. आदित्यच्या मित्राचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे तो दोन दिवसांपासून शाळेतच गेला नव्हता. त्याची शाळेतील प्रगतीही कमीच होती. अभ्यास करण्यावरून पालक त्याला अनेकवेळा रागावत होते. आदित्यच्या आईने एका कंपनीत नोकरी मिळवून बुधवारी त्‍यांचा नोकरीचा पहिलाच दिवस होता. आजोबा घरी होते, परिसरातील रुग्णालयात जाण्यापूर्वी त्‍यांनी आदित्यला तू एक लेसन पाठ कर, नंतर आपण रिव्हिजन घेऊ, असे आदित्य सांगून ते घराबाहेर पडले होते. मुकुंदवाडी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस अंमलदार श्री. जाधव अधिक तपास करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software