धक्कादायक… अत्‍याचार झालेल्या महिलेला सहानुभूती दाखवून स्वतःच बलात्‍कार करत राहिला; छत्रपती संभाजीनगरची एकही मोठी हॉटेल सोडली नाही, मुंबई, इगतपुरी, मनाली, गोवा फिरायला नेऊन करत राहिला जबरदस्ती, संबंधाचे व्हिडीओ, फोटोही काढले..!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अत्‍याचार झालेल्या महिलेला सहानुभूती दाखवून तिचा विश्वास संपादन करून स्वतःच तिच्यावर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये, वेगवेगळ्या शहरांत बलात्‍कार करत राहिला. ती त्‍याच्यापासून गर्भवती राहिली तरीही प्रसुतीच्या शेवटच्या दिवसांतही तिच्यावर बलात्‍कार केल्याने मृत बाळ जन्‍माला आले. त्‍यानंतरही त्‍याने लग्‍न केलेच नाही. अखेर तिने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुरुवारी (३ ऑक्‍टोबर) त्‍याच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अत्‍याचार झालेल्या महिलेला सहानुभूती दाखवून तिचा विश्वास संपादन करून स्वतःच तिच्यावर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये, वेगवेगळ्या शहरांत बलात्‍कार करत राहिला. ती त्‍याच्यापासून गर्भवती राहिली तरीही प्रसुतीच्या शेवटच्या दिवसांतही तिच्यावर बलात्‍कार केल्याने मृत बाळ जन्‍माला आले. त्‍यानंतरही त्‍याने लग्‍न केलेच नाही. अखेर तिने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुरुवारी (३ ऑक्‍टोबर) त्‍याच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक संजीव गुप्ता (रा. भगतसिंगनगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) असे संशयिताचे नाव आहे.

सिडको एन २ ठाकरेनगरातील ३० वर्षीय व्यावसायिक महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, तिचा २० जानेवारी २०२२ रोजी घटस्फोट झालेला आहे. पतीसोबत वादविवाद सुरू असताना तिची ओळख अभिषेक आणि त्‍याच्या मित्रासोबत २०१९ मध्ये ओळख झाली होती. अभिषेकच्या मित्राने केलेल्या अत्याचाराबद्दल व फसवणुकीबद्दल तिने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात २०२२ मध्ये तक्रार दिली होती. त्यावेळी तिला कुटुंबातील कोणीही आधार देण्यास तयार नव्हते. त्यावेळी अभिषेकने तिला साथ दिली. तुझ्याशी लग्न करू इच्छितो, असे आमिष त्याने दाखवून तिचा विश्वास संपादन केला.

अभिषेक शरीरसंबंध बनवण्यासाठी सारखा तिच्या मागे लागला होता. मात्र महिलेने त्याला मला लग्नाशिवाय काही करायचे नाही. पहिले लग्न होऊ दे. नंतर आपण पुढे संबंध बनवू, असे त्‍याला सांगितले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०२२ रोजी तो तिच्या राहत्या घरी आला. येताना दारूची बाटली आणली. बाटलीत त्याने आधीच गुंगीचे औषध टाकलेले होते. ते पिल्यानंतर महिला शुद्धीत नव्हती. त्याने बळजबरी तिच्यावर बलात्कार करून नग्न फोटो व नग्न व्हिडीओ शूटींग त्याच्या मोबाइलमध्ये केले. नंतर तो तिला पुन्हा पुन्हा शरीरसंबंधाबाबत आग्रह धरू लागला. त्याला महिलेने नकार दिल्यानंतर त्याने त्याच्याकडील तिचे नग्न फोटो व नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले.

३० नोव्‍हेंबर २०२२ रोजी अभिषेक नोएडा येथे असताना त्याने तिला फोनवर धमकावून नोएडा येथे बोलावून घेतले. तेथेदेखील हॉटेलमध्ये त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध प्रस्थापित केले. नंतर दुसऱ्या दिवशी तिला बाहेर फिरायला घेऊन गेला. त्यानंतर वेळोवेळी त्याने तिला छत्रपती संभाजीनगर शहरातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तसेच मुंबई, इगतपुरी, मनाली, गोवा आदी ठिकाणी हाॅटेल बुक करायला लावून तिथे तिला नेऊन तिच्यावर अनैसर्गिक बलात्‍कारही केला. विविध हॉटेलमध्ये बलात्कार करत असताना ती त्याला संमती देत आहे असे दर्शवणारे दोघांच्या शरीरसंबंधाचे नग्न फोटो व नग्न व्हिडीओ त्याच्या मोबाइलमध्ये सेव्ह करून ठेवल्याचेही महिलेने तक्रारीत म्‍हटले आहे.

म्हणे केस संपव, घरचे कर्ज उतरू दे…
महिला त्‍याला आपण लग्न कधी करणार असे विचारत होती. त्यावर तो तुझी पोलीस केस संपव आणि माझ्या घरचे कर्ज उतरू दे. त्यानंतर आपण लगेच लग्न करू, असे वचत देत होता. अभिषेकची आर्थिक परिस्थिती महिलेपेक्षा चांगली नाही. त्याने कर्ज फेडण्यासाठी पैशांची मागणी केल्यामुळे महिलेने त्‍याला वेळोवेळी आजपर्यंत ऑनलाइन बँकींगद्वारे १० लाख रुपये, रोख स्वरुपात १५ हजार रुपये दिलेले आहेत. पैकी अभिषेकने तिला १० लाख रुपये परत केले.

दुसरी महिलाही त्याच्या आयुष्यात…
दरम्यानच्या काळात तक्रारदार महिलेला अभिषेकच्या आधीच्या आयुष्यातील नाशिकच्या महिलेचा फोन व मेसेज आला. फोनद्वारे तिने तक्रारदार महिलेला सांगितले, की अभिषेकने तिच्यासोबतदेखील शरीर संबंध प्रस्थापित करून तिची आर्थिक फसवणूक केली आहे. तक्रारदार महिलेला अभिषेकवर संशय वाटू लागला. अभिषेकपासून तक्रारदार महिला गर्भवती राहिल्यामुळे ही बाब त्‍याला सांगून तिने लवकर विवाह करण्याची विनंती केली. त्‍या काळातही अभिषेक बलात्‍कार करतच होता. २८ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यरात्री अभिषेकला शरीरसंबंध करणे धोकादायक आहे हे माहित असतानाही त्याने पुणे शहरात तिच्या वडिलांच्या घरी तिच्यासोबत जबरीने शरीरसंबंध केले. त्‍यामुळे गर्भपिशवीचे तोंड उघडे राहून रक्तस्त्राव सुरू झाला. २९ ऑगस्टला तिची प्रसुती होऊन मृत बाळ जन्‍माला आले.

वचन न पाळल्याने तिने गाठले पोलीस ठाणे
१५ सप्‍टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ च्या सुमारास अभिषेकच्या आई-वडिलांनी तिला त्याच्या घरी गारखेडा परिसर, सुतगिरणी चौक येथे बोलावून जीवे मारण्याची धमकी दिल्याने महिलेने त्याच दिवशी ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावून घेतले. त्याच वेळी ते सगळेजण घरातून पळुन गेले. त्यानंतर पोलिसांनी महिलेला पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नेले. अभिषेक व तिच्यातील वाद सामोपचाराने मिटावे व त्याने वचन दिल्याप्रमाणे विवाह करावा व माफी मागावी म्हणून महिलेने त्याला १६ सप्‍टेंबर २०२४ रोजी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. या नोटीसला अभिषेकने उत्तर देताना तिच्यावरच खोटे आरोप केल्याचे महिलेने तक्रारीत म्‍हटले आहे. अभिषेक व त्याच्या वडिलांचा त्रास वाढल्याने २० सप्‍टेंबर २०२४ रोजी महिलेने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अभिषेक व त्याच्या वडिलांविरुद्ध ते तिच्याकडे दोन कोटी रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार केली. मात्र अभिषेक तिच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात खोटे तक्रार अर्ज देत आहे. अभिषेकचा व त्याच्या कुटुंबियांचा त्रास वाढत चालल्यामुळे ३० सप्‍टेंबरला ती त्याला प्रत्यक्ष भेटली असता त्याने तिला दोन दिवसांत लग्न करण्याचे आश्वासन दिले. मात्र ते वचनही पाळले नाही, असे महिलेने तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍यामुळे तिने काल, ३ ऑक्‍टोबरला मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अभिषेकविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष राऊत करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software