दुर्दैवी शंतनू…. इंटरव्ह्यूत नोकरी मिळाली, गूड न्‍यूज मित्रांना दिली, नियतीने ‘बॅड न्‍यूज’ ऐकवली!; दुचाकी दुभाजकाला धडकून BBA पदवीधारक तरुणाचा मृत्‍यू, छावणीजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएसएससीएन वृत्तसेवा) : बीबीए पदवीधारक तरुणाला वाळूज औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित कंपनीत मुलाखतीनंतर नोकरी लागली. त्‍या आनंदात तो घरी येत होता. निघण्याआधी मित्रांना त्‍याने गूड न्‍यूजही दिली… पण काहीच वेळाच त्‍याच्या मित्रांना बॅड न्‍यूजही ऐकावी लागली. दुचाकी डिव्हायडरला धडकून त्‍याचा मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (१७ ऑगस्ट) सायंकाळी साडेसातच्या सुमारास नगर रोडवरील […]

छत्रपती संभाजीनगर (सीएसएससीएन वृत्तसेवा) : बीबीए पदवीधारक तरुणाला वाळूज औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित कंपनीत मुलाखतीनंतर नोकरी लागली. त्‍या आनंदात तो घरी येत होता. निघण्याआधी मित्रांना त्‍याने गूड न्‍यूजही दिली… पण काहीच वेळाच त्‍याच्या मित्रांना बॅड न्‍यूजही ऐकावी लागली. दुचाकी डिव्हायडरला धडकून त्‍याचा मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (१७ ऑगस्ट) सायंकाळी साडेसातच्या सुमारास नगर रोडवरील लक्ष्मीमाता मंदिर परिसरात घडली.

शंतनू शिवाजी गाडेकर (वय २४, रा. सिडको एन ११, गजानननगर) असे अपघातात मृत्‍यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुलाखतीनंतर दुसऱ्याच दिवशी त्‍याला कंपनीने रूजू व्हायला सांगितले होते. शंतनूच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. ते एका कंपनीत व्यवस्थापक होते. दुचाकी डिव्हायडरला धडकल्यानंतर शंतनू गंभीर जखमी झाल्याने नागरिकांनी तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या अपघाताची नोंद छावणी पोलिसांनी केली आहे. तपास पोलीस अंमलदार संगीता दराडे करत आहेत. शंतनूच्या मागे आई व भाऊ असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software