७% कमिशनवर विद्यार्थ्यांचे बँक खाते ताब्‍यात घेऊन करायचे कोट्यवधी रुपयांचे बेनामी व्यवहार!; दहशतवाद विरोधी शाखेची छ. संभाजीनगरात मोठी कारवाई, एका गुजरातीसह शहरातील दोघांच्या मुसक्या आवळल्या

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा वापर करून क्रिप्टो व युएसडीटीसारख्या भारतात बंदी असलेल्या व्हर्च्युअल चलनाचे बेनामी व्यवहार करणाऱ्या तिघांच्या मुसक्या छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी शाखेने (एटीबी) मंगळवारी (१० सप्‍टेंबर) आवळल्या आहेत. तिघांना न्यायालयात हजर केले असता १५ सप्‍टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. उत्सवकुमार चंदूभाई भेसानिया (वय २३, रा. विश्वनगर सोसायटी, धावडा फाटा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा वापर करून क्रिप्टो व युएसडीटीसारख्या भारतात बंदी असलेल्या व्हर्च्युअल चलनाचे बेनामी व्यवहार करणाऱ्या तिघांच्या मुसक्या छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी शाखेने (एटीबी) मंगळवारी (१० सप्‍टेंबर) आवळल्या आहेत. तिघांना न्यायालयात हजर केले असता १५ सप्‍टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

उत्सवकुमार चंदूभाई भेसानिया (वय २३, रा. विश्वनगर सोसायटी, धावडा फाटा रोड, सुरत गुजरात), ऋषिकेश शिवनाथ भागवत (वय २३, रा. तेरणा हायस्‍कूलजवळ, सिंहगड कॉलनी, एन ६ सिडको, छत्रपती संभाजीनगर), अनुराग भाऊसाहेव घोडके (वय २१, रा. म्हसोबानगर जाधववाडी, छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ऋषिकेश कॉलेज ड्रॉप आऊट तर अनुराग विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. एटीबीला यासंदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी कारवाईचे आदेश देताच दहशतवाद विरोधी शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस ठाणे व छावणी वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदारांची चार वेगवेगळी पथके तयार करून मंगळवारी रात्री १० वाजता निराला बाजार येथील एका हॉटेलमध्ये छापा मारून तिघांना अटक करण्यात आली. त्‍यांच्याकडून मोबाइल, वेगवेगळे सिमकार्ड, वेगवेगळे बँकांचे क्रेडीट व डेबीट कार्ड जप्त करण्यात आले.

अशी होती गुन्ह्याची पद्धत…
एक वर्षापासून उत्सवकुमार, ऋषिकेश व अनुरागचा हा गोरखधंदा सुरू होता. अनुराग, ऋषिकेश हे मित्र परिवार, तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे कागदपत्रे घेऊन बँक खाते उघडायचे. या बँक खात्यांना जोडण्यासाठी मोबाइल क्रमांक मात्र उत्सवकुमार देत होता. खाते उघडल्यानंतर कार्ड, पासबुक, चेकबुकही उत्सवकुमार घेऊन जात होता. त्यानंतर बँक खात्यावरून परस्पर आर्थिक व्यवहार करायचा. यासाठी खातेधारकाला ७ टक्के कमिशन दिले जायचे. शहरातील महाविद्यालयांचे तरुण या रॅकेटमध्ये अडकल्याचे समोर येत आहे.

दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गिता बागवडे करत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार, वाहतूक शाखा छावणी विभागाचे अशोक भंडारे, दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे, आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोसीन सय्यद, सायबर पोलीस ठाण्याचे कदिर देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, दहशतवाद विरोधी शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी केली.

कोट्यवधीच्या उलाढालीची शक्यता…
-क्रिप्टो करन्सी एका वॉलेटमध्ये जमा करून ती आधी अमेरिकी डॉलरमध्ये व नंतर भारतीय रुपयांत रूपांतरित करत होते. यासाठी विद्यार्थ्यांच्या खात्यांचा वापर केला जायचा. टोळीने क्रिप्टो करन्सीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याची शक्यता आहे. त्याचा नेमका आकडा पोलीस शोधत आहेत.
-टोळी सर्व व्यवहार, घेवाण-देवाण, खाते उघडण्याची प्रक्रिया करण्यासाठी डार्क नेट म्हणजेच देशात बंदी असलेले डकडक गो सर्च इंजिन, ट्रस्ट वॉलेटचा वापर करत होते. डक डक गो सर्च इंजिन वापरून ट्रस्ट नावाच्या वॉलेटमध्ये पैसे जमा करायचे. ते यूएसडीटी (युनायटेड स्टेट्स डॉलर टेथर) या अाभासी चलनात रूपांतरित केले जायचे. मग ते अमेरिकी डॉलरमध्ये रूपांतर करून बँकांमधून भारतीय चलनात वटवले जात होते.
-क्रिप्टो अभासी (व्हर्चुअल) चलन आहे. भारतात यावर बंदी असून आरबीआयनेही मान्यता दिलेली नाही. यामध्ये व्यवहार करताना गुंतवणूकदाराला स्वतःच्या जबाबदारीवरच करावे लागते. क्रिप्टो चलन चोरीस गेल्यास माग काढणे अशक्य ठरते. हा पैसा अवैध व्यवसायांसह देशविरोधी कृत्यांसाठी वापरला जात असल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांना आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software