मिसारवाडीत मध्यरात्री १ ला आक्रोशाने भेदली भयाण शांतता! वाचवाऽऽ वाचवाऽऽ च्या किंकाळ्या… ६ जणांमध्ये जणू सैनात शिरला होता..

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील मिसारवाडीत आज, १८ नोव्‍हेंबरच्या पहाटे एकला थरारक घटना घडली. युवकाला घरातून बाहेर आणत सहा जणांनी बेदम मारहाण सुरू केली. त्‍याच्यावर स्टिल पाइप, चाकूने वार केले. लाथाबुक्‍क्‍यांनी बदडत होते. शेजारील लोक बघ्याची भूमिका घेत केवळ बघत होते. काही मिनिटांत युवक बेशुद्ध होऊन रक्‍ताच्या थारोळ्यात पडला. सिडको एमआयडीसी पोलिसांनी ६ हल्लेखोरांविरुद्ध […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील मिसारवाडीत आज, १८ नोव्‍हेंबरच्या पहाटे एकला थरारक घटना घडली. युवकाला घरातून बाहेर आणत सहा जणांनी बेदम मारहाण सुरू केली. त्‍याच्यावर स्टिल पाइप, चाकूने वार केले. लाथाबुक्‍क्‍यांनी बदडत होते. शेजारील लोक बघ्याची भूमिका घेत केवळ बघत होते. काही मिनिटांत युवक बेशुद्ध होऊन रक्‍ताच्या थारोळ्यात पडला. सिडको एमआयडीसी पोलिसांनी ६ हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विनोद नारायण त्रिभुवन (वय ३०, गल्ली नं. ७, मिसारवाडी छत्रपती संभाजीनगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. १६ नोव्‍हेंबर २०२४ रोजी पहाटे एकच्या सुमारास (मध्यरात्री) विनोद त्‍याच्या खोलीत झोपलेला होता. दुसऱ्या खोलीत त्‍याचे आई-वडील झोपलेले होते. त्याचवेळी अवी कांबळे (रा. गल्ली नं. ८, मिसारवाडी), त्याच्यासोबत दीपक वाघमारे व आणखी चौघे आले. त्‍यांनी घराचा दरवाजा तोडला व घरात घुसले. त्यानंतर विनोदला त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. मारहाण करतच घरासमोर आणले.

अवी कांबळे याने त्याच्याजवळ असलेल्या स्टिल पाईपने विनोदला उजव्या पायाच्या गुडघ्यापासून नळगीवर जोरजोरात फटके द्यायला सुरुवात केली. त्‍यामुळे विनोदच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तो ओरडू लागलो. विनोदची भावजय रुपाली भांडण सोडविण्यासाठी आली असता दीपक वाघमारे याने तिच्यावर चाकू उगारला असतो तो चाकू विनोदच्या उजव्या हाताच्या पंज्यावर लागला. पुन्हा त्याने उजव्या पायाच्या पंजावर चाकू मारला. नंतर सर्वांनी मिळून लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली.

विनोद रक्‍तबंबाळ होऊन कोसळला. एकाने बिअरची बाटली विनोदच्या डोक्‍यात मारली. विशेष म्‍हणजे, विनोदवर एवढा प्राणघातक हल्ला सुरू असताना गल्लीतील लोक बघ्याची भूमिका घेऊन होते. एकानेही विनोदला वाचविण्यासाठी धाव घेतली नाही. विनोदच्या आई-वडिलांना खोलीच्या बाहेरून कडी लावून घेत हल्लेखोरांनी आधीच बंद करून ठेवले होते. विनोद बेशुद्ध पडल्यानंतर हल्लेखोर निघून गेले. पोलिसांनी अवी कांबळे, दीपक वाघमारे व त्‍यांचे ४ साथीदार अशा ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक द्वारकाद्वास भालेराव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software