त्वचारोग लपवून लग्न केले, बिंग फुटल्यावर पत्‍नीवर लावले लेस्‍बियन असल्याचे आरोप, आपत्तीजनक फोटो तिच्या वडिलांना पाठवले पोस्टाने!, छ. संभाजीनगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : त्‍वचारोग लपवून ठेवला म्‍हणून तरुणीने डिव्‍होर्स घेतला, लग्नावर झालेला खर्चही परत मागितला. तो खर्च आधी देण्याचे मान्य करून नंतर चालढकल केल्याने तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्‍यामुळे संतापलेल्या तरुणाने वकील आणि वडिलांसोबत मिळून तरुणीचे तिच्या मैत्रिणीसोबत अश्लील फोटो तयार करून तेच पोस्टाने तिच्या वडिलांना पाठवून तब्‍बल ७५ लाख रुपयांची खंडणी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : त्‍वचारोग लपवून ठेवला म्‍हणून तरुणीने डिव्‍होर्स घेतला, लग्नावर झालेला खर्चही परत मागितला. तो खर्च आधी देण्याचे मान्य करून नंतर चालढकल केल्याने तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्‍यामुळे संतापलेल्या तरुणाने वकील आणि वडिलांसोबत मिळून तरुणीचे तिच्या मैत्रिणीसोबत अश्लील फोटो तयार करून तेच पोस्टाने तिच्या वडिलांना पाठवून तब्‍बल ७५ लाख रुपयांची खंडणी मागितली. तरुणीच्या वडिलांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणीच्या माजी पतीसह त्‍याचा पिता व वकील अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचे लग्न कटकट गेट भागातील तरुणासोबत झाले हाेते. मात्र त्‍याने लग्नावेळी स्वतःला त्‍वचारोग असल्याचे लपवले होते. ही बाब नंतर समोर आल्याने तरुणीने तलाक घेतला व लग्नावर झालेल्या ३० लाख रुपयांच्या खर्चाची मागणी केली. सुरुवातीला तरुण व त्‍याच्या वडिलांनी खर्च देण्यास तयारी दर्शवली.

मात्र नंतर चालढकल केली. त्‍यामुळे तरुणीने पोलिसांत तक्रार केली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. केस मागे घेण्यासाठी तरुणाने त्‍याच्या वकिलामार्फत दबाव आणायला सुरुवात केली. वकील महाशयांनी जरा जास्तच इंटरेस्ट घेतला. तरुणीच्या मैत्रिणीच्या घरी जात मैत्रिणीच्या वडिलांना तरुणी आणि तिची मैत्रीण यांच्यातील आक्षेपार्ह फोटो दाखवले व सांगितले की दोन्ही मुलींत अफेअर होते.

घटस्‍फोटित तरुणीच्या घरी पाठवले आक्षेपार्ह फोटो…
तेवढ्यावरच न थांबता तरुणाने त्‍याचा पिता आणि या वकिलासोबत मिळून पोस्टाद्वारे घटस्‍फोट घेणाऱ्या तरुणीच्या वडिलांना पोस्टाद्वारे काही फोटो पाठवले. ते अश्लीलरित्या बनवण्यात आले होते. त्‍यात तरुणी आणि तिची मैत्रीण आक्षेपार्ह अवस्थेत, अलिंगन घेतलेल्या व आपत्तीजनक अवस्थेत होत्‍या. याच फोटोसोबत धमकी दिलेला मजकूरही लिहिलेला होता. त्‍यातून ७५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली व घर घर गॅस सिलिंडर आहेत, आग कुठेही लागू शकते, अशी कुटुंबासह जीवे मारण्याची धमकीही दिली.

हे सर्व फोटो आणि धमकीचा मजकूर पाहून हादरून गेलेल्या तरुणीच्या पित्‍याने वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तलाक होण्याच्या काही दिवस आधी तरुणीचा मोबाइल पतीकडे होता. त्‍या मोबाइलमधील छायाचित्रे त्‍याने कॉपी करून घेत ती मॉर्फ करून अश्लील पद्धतीने बनवल्याचा संशय तरुणीच्या वडिलांना आहे. त्‍यावरून पोलिसांनी तरुण, त्‍याचा पिता आणि वकील अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक उत्तमराव जाधव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software