तीक्ष्ण वस्‍तूने वार करून तरुणाला केले जखमी, तिघांचे कृत्‍य, समतानगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घरासमोर उभे राहून गप्पा करण्याला विरोध केला म्‍हणून तिघांनी १८ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून तीक्ष्ण वस्‍तूने वार केले. यात तरुण जखमी झाला. ही घटना समतानगरात रविवारी (११ मे) रात्री १० च्या सुमारास घडली. रेहान अमजद कुरेशी (वय १८, रा. मोहम्मदिया मशिदीजवळ, जाकिर किराणा दुकानाच्या बाजूला, समतानगर छत्रपती संभाजीनगर) याने […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घरासमोर उभे राहून गप्पा करण्याला विरोध केला म्‍हणून तिघांनी १८ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून तीक्ष्ण वस्‍तूने वार केले. यात तरुण जखमी झाला. ही घटना समतानगरात रविवारी (११ मे) रात्री १० च्या सुमारास घडली.

रेहान अमजद कुरेशी (वय १८, रा. मोहम्मदिया मशिदीजवळ, जाकिर किराणा दुकानाच्या बाजूला, समतानगर छत्रपती संभाजीनगर) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो सावरकर चौकात पालखी वॉशिंग सेंटरवर काम करतो. रविवारी रात्री १० च्या सुमारास तो समतानगर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर पटांगणात उभा असताना नूतन कॉलनी, मुनलाईट हॉटेलसमोर राहणारा मुलगा मुज्जू पठाण व त्याच्यासोबत उजेन बागवान, मुदस्सीर पठाण हे त्याच्या घरासमोर उभे राहून गप्पा मारत होते.

रेहानने त्यांना ‘तुम्ही आमच्या घरासमोर उभे राहून गप्पा मारू नका’ असे सांगितले. त्यावरून तिघांनी शिविगाळ करून मुज्जू पठाण याने मागून दोन्ही हात धरून ठेवले. मुदस्सिरने त्याच्या हातातील काहीतरी तिक्ष्ण वस्तूने रेहानच्या नाकावर मारून नाक फोडून जखमी केले. आमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली तर तुझे हातपाय तोडून टाकू, अशी धमकी दिली. घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आज रेहाने तिघांविरुद्ध क्रांती चौक पोलिसांत तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार बाळू जाधव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software