तिघांनी तरुणाला गाठून चाकूचे केले सपासप वार, विभक्‍त राहणाऱ्या पत्‍नीने कॉल करून धमकावले, अशा घटना पुन्हा घडतील!, वाळूज MIDC तील धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : तिघांनी तरुणाला गाठून बॅटने मारहाण करत चाकूचे सपासप वार करून गंभीर जखमी केले. त्‍यानंतर विभक्‍त राहणाऱ्या पत्‍नीने तरुणाच्या आईला कॉल करून धमकावले, की अशा घटना पुन्हा घडतील… तरुणाने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विभक्‍त राहणाऱ्या पत्‍नीसह हल्लेखोर तिच्या ३ मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल दिलीप खराडे असे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : तिघांनी तरुणाला गाठून बॅटने मारहाण करत चाकूचे सपासप वार करून गंभीर जखमी केले. त्‍यानंतर विभक्‍त राहणाऱ्या पत्‍नीने तरुणाच्या आईला कॉल करून धमकावले, की अशा घटना पुन्हा घडतील… तरुणाने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विभक्‍त राहणाऱ्या पत्‍नीसह हल्लेखोर तिच्या ३ मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल दिलीप खराडे असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो बजाजनगरातील मोहटादेवी मंदिराजवळील सीतानगरात आजीसोबत राहतो. त्याची आई धुळ्याला राहते. २०१७ मध्ये त्‍याचे लग्‍न पल्लवी दिनेश काशिद हिच्यासोबत झाले होते. लग्नानंतर त्‍यांना दोन मुली झाल्या. मात्र नंतर दोघांत भांडणे होऊ लागली. दोघे विभक्‍त स्वरुपात राहू लागले. दोन्ही मुली पल्लवीकडे राहतात. १० डिसेंबरला रात्री ८.४५ च्या सुमारास पल्लवीने राहुलला कॉल करून गाडी घेऊन या. मला कपडे खरेदी करायचे आहेत, असे सांगितले. त्यामुळे राहुल तिला घेऊन खरेदीसाठी गेला. खरेदीनंतर त्याने तिला तिच्या घरी सोडले. राहुल घरी जात असताना पुन्हा पल्लवीने कॉल केला. माझी गाडी दुरुस्तीसाठी गॅरेजला घेऊन जात आहे.

तुम्ही पुन्हा परत या, असे तिने सांगितल्याने तो पुन्हा पल्लवीकडे निघाला असता सिडको गार्डनजवळ तीन तरुणांनी त्‍याला अडवले. त्‍याला गाडीवरून खाली पाडत दोघांनी बॅटने मारण्यास सुरुवात केली. तिसऱ्याने छातीत व पाठीत चाकूचे सपासप वार केले. त्‍यामुळे राहुल गंभीर जखमी झाला. जिवाच्या आकांताने त्‍याने पळ काढला. त्‍यामुळे हल्लेखोर तरुण पसार झाले. बजाजनगरातील एका खासगी रुग्णालयात तो उपचारासाठी दाखल झाला. पल्लवीने त्‍याला पाहण्याच्या निमित्ताने येऊन त्याच्या फोनमधील कॉल हिस्ट्री डिलीट केली. त्‍यानंतर धुळे येथे राहत असलेल्या राहुलच्या आईला कॉल करून अशा घटना पुन्हा घडती, असे धमकावले. उपचारानंतर राहुलने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पल्लवी काशिद हिच्यासह तिच्या ३ मित्रांविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software