- News
- सिटी क्राईम
- तरुण अभियंत्याच्या आत्महत्येने वाळूज MIDC हादरली!; सव्वा महिन्यापूर्वीच झाले होते लग्न, इंटरव्ह्य...
तरुण अभियंत्याच्या आत्महत्येने वाळूज MIDC हादरली!; सव्वा महिन्यापूर्वीच झाले होते लग्न, इंटरव्ह्यूला जाणाऱ्या पत्नीला शेवटचे बेस्ट लक केले अन्…
-जॉब सुटल्याने सिडको एन ९ मध्ये तरुणाची आत्महत्या-हर्सूलच्या चेतनानगरात १५ वर्षीय मुलीची आत्महत्या छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको वाळूज महानगरातील देवगिरीनगरमध्ये २६ वर्षीय अभियंत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (६ ऑगस्ट) सकाळी नऊला समोर आली. सव्वा महिन्यापूर्वीच त्याने लग्न झाले होते. अचानक त्याने टोकाचे पाऊल का उचलले, याची चर्चा होत […]
-जॉब सुटल्याने सिडको एन ९ मध्ये तरुणाची आत्महत्या
-हर्सूलच्या चेतनानगरात १५ वर्षीय मुलीची आत्महत्या
३० वर्षांपूर्वी आंबाडे (ता. भोर, जि. पुणे) येथून भरत खोपडे हे उदरनिर्वाहासाठी वाळूज एमआयडीसीत आले. काही दिवस भाड्याने खोली घेऊन राहिले. नंतर देवगिरीनगरात त्यांनी स्वतःचे घर खरेदी केले आणि कायमचे वाळूज महानगरात स्थायिक झाले होते. त्याच्या मुलीचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यानंतर आता सव्वा महिन्यापूर्वी रोहितचेही लग्न झाल्याने मोठ्या जबाबदारीतून मोकळे झाल्याची भावना भरत खोपडे यांच्यात असतानाच असे दुर्दैवी पाऊल रोहितने उचलले. रोहितचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण वाळूज एमआयडीसीतच झाले. शांत- संयमी असलेल्या रोहितने असे टोकाचे पाऊल का उचलले, अशी चर्चा करत नागरिक हळहळ व्यक्त करत होते. रोहितकडे कुठलीही चिठ्ठी आढळली नाही. त्याने आत्महत्या का केली, याचा तपास वाळूज एमआयडीसी पोलीस करत आहेत.
जॉब सुटल्याने सिडको एन ९ मध्ये तरुणाची आत्महत्या
जॉब सुटल्याने नैराश्य आलेल्या सौरभ प्रमोद पाटील (वय २३) याने मंगळवारी (६ ऑगस्ट) सकाळी दहाला राहत्या घरात आत्महत्या केली. तो कुटुंबासह सिडको एन ९, रेणुका माता मंदिरामागे राहत होता. प्लास्टिक इंजिनिअरिंगचा कोर्स केलेल्या सौरभ एका कंपनीत नोकरीला होता. काही दिवसांपूर्वी कंपनीने त्याला गॅप दिला होता. सोमवारी रात्री तो आई-वडिलांसोबत कॉलवर बोलला.
मंगळवारी सकाळी वडिलांनी कॉल केल्यावर प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांनी घरी नातेवाइकांना पाठवल्यानंतर सौरभने गळफास घेतल्याचे दिसले. सौरभची बहीण जळगावला शिक्षण घेते. काही महिन्यांपूर्वी त्याचे आई, वडील शेती सांभाळण्यासाठी जळगावला राहण्यास गेले होते. त्यामुळे तो घरी एकटाच राहत होता. दोन मजले भाडेतत्त्वावर दिले असून शेवटच्या मजल्यावर सौरभ राहत होता. पाच- सहा दिवसांपूर्वी गुरुपौर्णिमेनिमित्त त्याचे आई-वडील शहरात येऊन गेले होते.
हर्सूलच्या चेतनानगरात १५ वर्षीय मुलीची आत्महत्या
हर्सूलच्या चेतनानगरात सुहाना सदफ शेख जमील (वय १५) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ती मौलाना आझाद कॉलेजमध्ये अकरावीला विज्ञान शाखेत शिकत होती. सुहाना आई, मोठी बहीण, भाऊ, वहिनीसोबत राहत होती. सोमवारी रात्री भावाची लहान मुलगी रडत असल्याने सुहानाने तिला सांभाळले. तिला खेळवत बाहेरून चॉकलेट आणून दिले. ती शांत झाल्याने सुहाना अभ्यासासाठी गेली.
मात्र, तेवढ्यात भाची पुन्हा रडायला लागली. त्यामुळे भाऊ सुहानावर रागावला. त्यानंतर सुहाना खोलीत गेली ती बाहेर आलीच नाही. रात्री साडेदहाला आई व मोठ्या बहिणीने जेवणासाठी सुहानाला आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दरवाजाच्या छिद्रातून पाहिल्यावर सुहानाने गळफास घेतल्याचे दिसले. हर्सूल पोलीस तिच्या आत्महत्येच्या कारणाचा तपास करत आहेत.

