तरुणाच्या ब्‍लॅकमेलला कंटाळून मेडिकलच्या विद्यार्थिनीची आत्‍महत्‍या, सिडको एन ५ मधील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील फोस्टर कॉलेजमध्ये बीएचएमएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थिनीने गावातील तरुणाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची घटना सिडको एन ५ मधील मातादी वसतिगृहात घडली. पोलिसांनी तिच्या मावशीच्या तक्रारीवरून आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून दत्तू बाबासाहेब गायके (रा. जानेफळ, ता. वैजापूर) याला आज, ३१ जुलैला अटक केली आहे. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील फोस्टर कॉलेजमध्ये बीएचएमएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थिनीने गावातील तरुणाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची घटना सिडको एन ५ मधील मातादी वसतिगृहात घडली. पोलिसांनी तिच्या मावशीच्या तक्रारीवरून आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून दत्तू बाबासाहेब गायके (रा. जानेफळ, ता. वैजापूर) याला आज, ३१ जुलैला अटक केली आहे.

गायत्री बाबासाहेब दाभाडे (वय २१, रा. जानेफळ, ता. वैजापूर) असे आत्‍महत्‍या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती सिडको एन ५ मधील मातादी वसतिगृहात राहत होती. पोलिसांनी दत्तूला न्यायालयात हजर केले असता ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. दत्तू शेती करतो. गायत्रीची मावशी कल्पना सूर्यवंशी (रा. संतोषीमातानगर, वैजापूर) यांनी या प्रकरणात सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गायत्रीचे आई-वडील भोळसर आहेत. गायत्रीने मावशीला दत्तू देत असलेल्या त्रासाची कल्पना दिली होती.

त्‍यावेळी कल्पना यांनी दत्तूला समजावूनही सांगितले होते. मात्र दत्तू ऐकत नव्हता. गायत्री गावाकडे असतात दत्तूशी तिची ओळख झाल्याने दोघे अधूनमधून बोलत होते. मात्र शहरात आल्यापासून बोलणे बंद केल्याने दत्तू वारंवार कॉल करत होता. भेटण्यासाठी बोलावत होता. कॉल उचलला नाही की मेसेज करतो. ब्लॉक केल्यावर नवीन क्रमांकावरून फोन करतो. पाच-पाच मिनिटांनी कॉल करून त्रास देतो, असे गायत्रीने मावशीला सांगितले होते. त्‍याच्या त्रासाला कंटाळून गायत्रीने २५ जुलैला वसतिगृहात गळफास आत्‍महत्‍या केली. अधिक तपास पोलीस अंमलदार श्री. तेलुरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software