ट्युशनवरून घरी आली अन्‌ गळफास घेतला!; अकरावीच्या विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल, मुकुंदवाडीतील धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुकुंदवाडीतील राजीव गांधीनगरमध्ये १६ वर्षीय मुलीने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (११ ऑक्‍टोबर) सायंकाळी ७ वाजता समोर आली. ट्यूशनवरून घरी परतल्यानंतर या मुलीने टोकाचे पाऊल उचलले. त्रिपुरा जगन अवटे असे तिचे नाव आहे. त्रिपुरा अकरावीत होती. रोज सकाळी ट्यूशनला जात होती. तिचे वडील एका खासगी कंपनीत […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुकुंदवाडीतील राजीव गांधीनगरमध्ये १६ वर्षीय मुलीने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (११ ऑक्‍टोबर) सायंकाळी ७ वाजता समोर आली. ट्यूशनवरून घरी परतल्यानंतर या मुलीने टोकाचे पाऊल उचलले. त्रिपुरा जगन अवटे असे तिचे नाव आहे.

त्रिपुरा अकरावीत होती. रोज सकाळी ट्यूशनला जात होती. तिचे वडील एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत, तर आई ब्युटी पार्लर चालवते. शुक्रवारी सकाळी आई खरेदीसाठी बाहेर गेली होती. वडील कंपनीत गेले होते. त्रिपुरादेखील ट्युशनला गेली होती. दुपारी एकला ती घरी आली. बेडरूममध्ये तिने गळफास घेतला. त्यानंतर काहीच वेळात आईही घरी आली.

मात्र झोपली असेल म्‍हणून तिच्या आईने तिच्या खोलीचा दरवाजा ठोठावला नाही. सायंकाळी सहाला तिचा भाऊ पतंग खेळत असताना त्याला खिडकीतून त्रिपुराने गळफास घेतल्याचे दिसले. त्याने आरडाओरड सुरू केली. त्यामुळे शेजारी धावून आले. दरवाजा तोडून त्रिपुराला फासावरून उतरवत घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अधिक तपास मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार दिगंबर धारबळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software