- News
- सिटी क्राईम
- ज्याचे खाल्ले मीठ… त्याच्यावरच उलटला..!; लक्ष्मी मिल्कच्या मालकावर कामगाराचा साथीदारांसोबत मिळून जीव...
ज्याचे खाल्ले मीठ… त्याच्यावरच उलटला..!; लक्ष्मी मिल्कच्या मालकावर कामगाराचा साथीदारांसोबत मिळून जीवघेणा हल्ला!!, वाळूज MIDC पुन्हा हादरले….
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मार्केटिंगसाठी नेमलेल्या कामगाराने मालकाशीच गद्दारी केली. ही बाब कळल्यानंतर मालकाने त्याला कामावरून काढले. त्याचा राग येऊन या बहाद्दर कामगाराने साथीदारांसोबत मिळून मालकावरच जीवघेणा हल्ला चढवला. बेदम मारहाण केली. यात मालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (३० जून) बजाजनगरात घडली. नागेश्वर रमेशराव मुळे (रा. सिडको वाळूज महानगर) यांची सोनखेडा […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मार्केटिंगसाठी नेमलेल्या कामगाराने मालकाशीच गद्दारी केली. ही बाब कळल्यानंतर मालकाने त्याला कामावरून काढले. त्याचा राग येऊन या बहाद्दर कामगाराने साथीदारांसोबत मिळून मालकावरच जीवघेणा हल्ला चढवला. बेदम मारहाण केली. यात मालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (३० जून) बजाजनगरात घडली.
रविवारी दुपारी मुळे हे बजाजनगरातील कार्यालयात असताना त्यांना शंकर पवार या व्यक्तीने फोन करून कार्यालयाबाहेर बोलावून घेतले. काही वेळातच राहुल दुचाकीवरून चार साथीदारांना घेऊन तेथे आला. शंकर पवार, राहुल पवार व त्यांच्यासोबत असलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी लाथा- बुक्क्यांनी व लाकडी दांड्याने मुळे यांना मारहाण केली. मुळे यांच्या ओरडण्याच्या आवाजाने कार्यालयातील कामगार बाहेर आले. त्यांनी मुळे यांची सुटका केली. मुळे यांच्या हाताचे मनगट फॅक्चर झाले असून, ते गंभीर जखमी झाले आहेत.
मारहाणीत मुळेंचा मोबाइलही हल्लेखोराने हिसकावून १० हजार रुपयांची मागणी केली. मुळे यांनी १० हजार रुपये दिल्यावरच हल्लेखोरांनी मोबाइल परत दिला. त्यानंतर ते पसार झाले. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भरदुपारी झालेल्या या मारहाणीच्या घटनेने वाळूज एमआयडीसीत खळबळ उडाली आहे. नागेश्वर मुळे यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी शंकर पवार, राहुल पवार व त्यांच्या चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

