- News
- सिटी क्राईम
- जुन्या मोंढ्यातील तक्षशिलानगरमध्ये गोळीबार!
जुन्या मोंढ्यातील तक्षशिलानगरमध्ये गोळीबार!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जुन्या मोंढ्यातील तक्षशिलानगरमध्ये शनिवारी (२४ ऑगस्ट) रात्री ९:३० वाजता गोळीबार झाल्याच्या प्रकाराचे खळबळ उडाली आहे. सुसाट तीन दुचाकींवरून ५ ते ६ तरुण शिवीगाळ, आरडाओरड करत होते. त्यांना स्थानिक तरुणांनी आरडाओरड न करण्यास सांगितले असता त्यातील एकाने कंबरेला लावलेली पिस्तूल काढून गोळीबार केला. दोन ते तीन फायरिंग होऊन भिंतीला छिद्र पडले. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जुन्या मोंढ्यातील तक्षशिलानगरमध्ये शनिवारी (२४ ऑगस्ट) रात्री ९:३० वाजता गोळीबार झाल्याच्या प्रकाराचे खळबळ उडाली आहे. सुसाट तीन दुचाकींवरून ५ ते ६ तरुण शिवीगाळ, आरडाओरड करत होते. त्यांना स्थानिक तरुणांनी आरडाओरड न करण्यास सांगितले असता त्यातील एकाने कंबरेला लावलेली पिस्तूल काढून गोळीबार केला. दोन ते तीन फायरिंग होऊन भिंतीला छिद्र पडले. त्यातील एक काडतूस पोलिसांना मिळाले. घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
तक्षशिलानगरच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर पायऱ्यांवर काही स्थानिक तरुण रात्री नऊला गप्पा मारत होते. मोंढा नाक्याकडून सुसाट वेगात तीन दुचाकींवर ५ ते ६ तरुण शिवीगाळ, आरडाओरड करत आले. तिथून महिला शतपावली करत असल्याने स्थानिक तरुणांनी त्यांना आरडाओरड, शिवीगाळ करू नका, असे बजावले. त्यामुळे ते संतापले. त्यांनी दुचाकी गाड्या थांबवून शिवीगाळ सुरू केली. त्यातील एकाने कंबरेला लावलेली पिस्तूल काढल्यावर एकच पळापळ सुरू झाली. त्याने गोळीबार सुरू केला. दोन-तीन फायरिंग केल्याचे आवाज झाले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

