जावयाचा सासरवाडीत राडा; सासू-सासऱ्यावर कोयत्‍याचे वार, राजनगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीशी पटत नसल्याने पत्‍नी माहेरी आली. १५ दिवसांपासून ती माहेरी राहत असताना तिच्या पतीने येऊन सासरवाडीत राडा केला. सासू, सासऱ्यांवर कोयत्‍याचे वार करून जखमी केले. लाडकी बहीण योजनेचे पैसे काढायला पत्‍नी गेलेली असल्याने वाचली. ही घटना मुकुंदवाडी परिसरातील राजनगरात समोर आली आहे. मिठू अंबाजी आर्सूड (वय ७७, रा. मुकुंदवाडी रेल्वे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीशी पटत नसल्याने पत्‍नी माहेरी आली. १५ दिवसांपासून ती माहेरी राहत असताना तिच्या पतीने येऊन सासरवाडीत राडा केला. सासू, सासऱ्यांवर कोयत्‍याचे वार करून जखमी केले. लाडकी बहीण योजनेचे पैसे काढायला पत्‍नी गेलेली असल्याने वाचली. ही घटना मुकुंदवाडी परिसरातील राजनगरात समोर आली आहे.

मिठू अंबाजी आर्सूड (वय ७७, रा. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनसमोर राजनगर मुकुंदवाडी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, ते पत्नी सागरबाई, मुलगा कल्याण, सून कालिंदा यांच्यासह राहतात. त्यांची मुलगी रेखा हिचे लग्न चरण रत्नाकर भोसले याच्यासोबत २००९ साली झालेले आहे. तिला डोंगरगाव (ता. बदनापूर) येथे दिलेले आहे. पतीसोबत वाद झाल्याने ती १५ दिवसांपासून माहेरी आलेली आहे. गुरुवारी (१६ ऑगस्ट) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रेखा लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी गेली होती. त्यावेळी मिठू आर्सूड आणि त्‍यांची पत्नी दोघेच घरी होते.

त्‍याचवेळी रेखाचा पती चरण आला. रेखा कुठे आहे, असे विचारून त्‍याने शिवीगाळ सुरू केली. लोखंडी कोयत्याने सासू सागरबाईंच्या दोन वार केले. मिठू हे पत्‍नीला वाचवायला धावले असता त्‍याने त्‍याने त्‍यांच्याही डोक्‍यात कोयत्याचे वार केले. त्‍यामुळे दोघे बेशुद्ध पडले. त्‍यानंतर जावई चरण पळून गेला. सून कालिंदा पाण्याचा जार घेऊन घरी आली तेव्हा तिला सासू, सासरे बेशुद्धावस्थेत दिसल्याने तिने तातडीने रिक्षाने त्‍यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर सोमवारी (१९ ऑगस्ट) मिठू यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी जावई चरणविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software