जालना रोडवर मोठी चोरी!; अपना बाजार इमारतीतील शीतल एजन्सी फोडून २.४१ लाखांवर डल्ला, चोर CCTV त कैद

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जालना रोडवरील अपना बाजार इमारतीतील शीतल एजन्सी फोडून चोरट्यांनी गल्ल्यातील २ लाख ३१ हजारांची रोख रक्कम लंपास केली. ही घटना गुरुवारी (२८ नोव्हेंबर) सकाळी समोर आली. जवाहरनगर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आनंद सुमेरनंद बन्सल (वय ४७, रा. सिडको एन-१) यांच्या फिर्यादीनुसार, त्‍यांचे अपना बाजार इमारतीत शीतल एजन्सी नावाने […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जालना रोडवरील अपना बाजार इमारतीतील शीतल एजन्सी फोडून चोरट्यांनी गल्ल्यातील २ लाख ३१ हजारांची रोख रक्कम लंपास केली. ही घटना गुरुवारी (२८ नोव्हेंबर) सकाळी समोर आली. जवाहरनगर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आनंद सुमेरनंद बन्सल (वय ४७, रा. सिडको एन-१) यांच्या फिर्यादीनुसार, त्‍यांचे अपना बाजार इमारतीत शीतल एजन्सी नावाने बेअरिंगचे दुकान आहे. २७ नोव्हेंबरला सायंकाळी सव्वासातला दुकान बंद करून ते घरी गेले. मध्यरात्रीतून चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करून गल्ल्यातील २ लाख ३१ हजारांची रोख रक्कम लंपास केली. दुसऱ्या दिवशी सकाळी बन्सल हे दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानात चोरी झाल्याचे त्‍यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ जवाहरनगर पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांनी पथकासह घटनास्थळी येऊन पाहणी केली. श्वानपथक व ठसेतज्‍ज्ञांनाही पाचारण केले होते. पोलिसांना घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, त्‍यात चोर दिसत आहे. त्‍याचा शोध पोलीस घेत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software