जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंत्‍याची पत्रकाराला मारहाण, जीवे मारण्याची धमकी, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार, वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मृद व जलसंधारण विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंत्‍याने विरोधात आलेल्या बातमीबद्दल साप्‍ताहिकाच्या संपादकाला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उन्‍नती साप्‍ताहिकाचे संपादक बाजीराव भानुदास सोनवणे (वय ५१, रा. गजानननगर, गारखेडा परिसर) यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिसांनी प्रभारी कार्यकारी अभियंता सुंदर वाघमारे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मृद व जलसंधारण विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंत्‍याने विरोधात आलेल्या बातमीबद्दल साप्‍ताहिकाच्या संपादकाला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उन्‍नती साप्‍ताहिकाचे संपादक बाजीराव भानुदास सोनवणे (वय ५१, रा. गजानननगर, गारखेडा परिसर) यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिसांनी प्रभारी कार्यकारी अभियंता सुंदर वाघमारे यांच्याविरुद्ध आज, २१ डिसेंबरला गुन्हा दाखल केला आहे.

बाजीराव सोनवणे हे आई, पत्नी, ३ मुलांसह राहतात. त्यांचे उन्नती साप्ताहिक वर्तमानपत्र आहे. त्यांनी त्यांच्या साप्ताहिकात ‘अभियंता वाघमारे नावाने सुंदर मात्र भ्रष्टाचाराने झाले विकृत, राजकारणाच्या जोरावर हात पाय तोडण्याची भाषा’ या मथळ्याखाली बातमी छापली होती. छापलेली बातमी ही वस्तुस्थिती दाखविणारी होती. छापलेल्या साप्ताहिकाच्या प्रती विविध वरिष्ठ कार्यालयांत वाचकांसाठी मोफत टेबलवर जाऊन करण्यात येत असताना मंगळवारी (१७ डिसेंबर) अधीक्षक अभियंता मृद व जलसंधारण विभाग यांच्या कार्यालयात साप्ताहिकाचे अंक देण्यासाठी सोनवणे स्वतः गेले होते.

अधीक्षक अभियंता अजित परांडे यांची भेट घेऊन त्यांनी बातमीचा पाठपुरावा घेतला आणि कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी प्रभारी कार्यकारी अभियंता सुंदर वाघमारे हे त्यांच्या गाडीतून उतरून सोनवणे यांच्याजवळ आले. “तू माझ्याविरुध्द बातम्या छापतोस का? तू तुझे साप्ताहिक या कार्यालयात कसे वाटप केले, माझ्याविरुध्द बातमी छापून माझ्या वरिष्ठ कार्यालयात पेपर वाटतोस का? तुझे हात-पाय तोडतो, डोळे फोडून टाकतो, अशी धमकी देऊन अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केली.

त्‍यांच्या शिवीगाळ व धमक्यांचे सोनवणे यांनी मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग सुरू केले असता कार्यकारी अभियंता सुंदर वाघमारे यांनी, तू मोबाईल बंद कर, रेकॉर्डिंग करू नकोस असे म्हणत सोनवणे यांच्या हातातील मोबाइल हिकासवून घेत फेकून दिला व सोनवणे यांना हाताने मारहाण सुरू केली. “तू यानंतर बातमी छापली तर पेपर वाटायला तू राहणार नाही’, असे धमकावले. तुझ्याविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी दिली. त्‍यानंतर सोनवणे यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन प्रभारी कार्यकारी अभियंता सुंदर वाघमारे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी वाघमारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस आयुक्‍त संपत शिंदे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software