- News
- सिटी क्राईम
- छ. संभाजीनगरात वासनांधांचा कहर सुरूच…!; ना शाळकरी मुलगी सुरक्षित, ना ६७ वर्षांची वृद्धा… सामान्यांचे...
छ. संभाजीनगरात वासनांधांचा कहर सुरूच…!; ना शाळकरी मुलगी सुरक्षित, ना ६७ वर्षांची वृद्धा… सामान्यांचे आता डोके काम करेनासे झालेय..!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरात वासनांधांनी कहर केला आहे. रोज विनयभंगाच्या दोनतीन घटना समोर येत आहे. कधी रिक्षावाला, कधी बसमध्ये टवाळखोर, तर कधी रोडरोमिओ…यांच्यापासून ना शाळकरी मुलगी सुरक्षित आहे, ना ६७ वर्षांची वृद्धा…आता आणखी ४ घटना समोर आल्या आहेत. -पैठण रोडवरील एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनी शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करतानाच नितीन बाबूराव अंभोरे […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरात वासनांधांनी कहर केला आहे. रोज विनयभंगाच्या दोनतीन घटना समोर येत आहे. कधी रिक्षावाला, कधी बसमध्ये टवाळखोर, तर कधी रोडरोमिओ…यांच्यापासून ना शाळकरी मुलगी सुरक्षित आहे, ना ६७ वर्षांची वृद्धा…आता आणखी ४ घटना समोर आल्या आहेत.
-कामाहून घरी परतणाऱ्या महिलेला वाटेत अडवून गणेश अशोक सुखदान (वय २९, रा. पंढरपूर) याने तिच्याशी अश्लील वर्तन केले. ही घटना पंढरपूर परिसरात घडली. महिलेच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गणेशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी महिला कामावरून घरी येत होती. गणेशने तिला रस्त्यात अडवून अश्लील चाळे केले. तू कोणाला काही सांगितले तर तुझ्या पती व मुलांना ठार मारून टाकेल, अशी धमकीही दिली. महिलेने बदनामी होईल गप्प बसली. त्यानंतर पुन्हा आता रात्री ११.३० वाजता गणेशने तिचे घर गाठून दरवाजा उघडण्यासाठी धमकावले. पतीने चौकशी केली असता यापूर्वीही गणेशने रस्त्यात अडवून छेड काढल्याची माहिती महिलेने दिली.
-सातारा गावातील एका महिलेच्या घरात घुसून तरुणाने छेड काढली. आकाश पवार याच्याविरुद्ध महिलेच्या तक्रारीवरून सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

