छ. संभाजीनगरच्या विद्यार्थिनी स्‍कूलबसमध्ये राहणार सुरक्षित; पोलिसांची मोठी ॲक्‍शन!; ८७ शाळा-कॉलेजमध्ये एकाचवेळी धडकले, १४ स्‍कूलबस-रिक्षांवर कारवाई

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शालेय स्कूल बसमध्ये प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार यांनी कठोर पावले उचलली आहेत. कोणतेही अनुचित प्रकार यापुढे घडू नये यासाठी पोलिसांनी शहरातील सर्व शाळा, कॉलेजला भेटी देऊन विद्यार्थिनींच्या सुरक्षेविषयी आढावा घेऊन सुरक्षेबद्दल अधिक उपाययोजना करण्याच्या कडक सूचना लेखी पत्राद्वारे केल्या आहे. ८६ शाळा, कॉलेजमध्ये पोलीस धडकले. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शालेय स्कूल बसमध्ये प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार यांनी कठोर पावले उचलली आहेत. कोणतेही अनुचित प्रकार यापुढे घडू नये यासाठी पोलिसांनी शहरातील सर्व शाळा, कॉलेजला भेटी देऊन विद्यार्थिनींच्या सुरक्षेविषयी आढावा घेऊन सुरक्षेबद्दल अधिक उपाययोजना करण्याच्या कडक सूचना लेखी पत्राद्वारे केल्या आहे. ८६ शाळा, कॉलेजमध्ये पोलीस धडकले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १४ स्कूल बस, रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तपासून लायसन्स, आधार कार्ड यांच्या छायांकीत प्रती पोलिसांनी हस्तगत केल्या. शालेय स्तरावर बसचालक, शिक्षक, पालक व पोलीस यांची शालेय परिवहन समिती स्थापन करून दर महिन्याला या समितीची बैठक घेण्यात यावी, बसेस तसेच रिक्षा व स्कूल व्हॅनमधून ये-जा करणाऱ्या विद्यार्थिंनीच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे शाळेची असून, त्यासाठी वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शाळा, महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी.

प्रत्येक शाळा, महाविद्यालयात CCTV कॅमेरे बसवून ते नियमित चेक करावे. काही आक्षेपार्ह आढळून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. शाळा, महाविद्यालयातील शिपाई, कर्मचारी, वाहन चालक व इतर स्टाफपैकी कोणीही व्यसनी नसावा, असल्यास तात्काळ संबंधितावर कारवाई करावी. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनास आपत्कालीन दरवाजा असावा व प्रथम उपचार पेटी ठेवावी. वाहनचालकांना गणवेश परिधान करणे अनिवार्य करावे. रिक्षात उजव्या बाजूने विद्यार्थी चढू अथवा उतरू नये यासाठी लोखंडी जाळी लावून ती बाजू बंद ठेवावी.

नियमापेक्षा जास्त विद्यार्थी घेऊन जाऊ नये. प्रत्येक वाहनात मदतनीस म्हणून महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशा सूचना शाळा, कॉलेजला करण्यात आल्या आहेत. ही कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्‍त प्रविण पवार, पोलीस उपायुक्‍त शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्‍त (वाहतूक) धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक (वाहतूक) सचिन इंगोले, अमोल देवकर, अशोक भंडारे, सहायक पोलीस निरीक्षक हरेश्वर घुगे, विवेक जाधव यांच्यासह वाहतूक विभागाच्या इतर अधिकारी व अंमलदारांनी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी

Latest News

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागात एम. फार्मसी अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी...
आयआरसीटीसीच्या कन्फर्म तिकिटात नाव बदलायचे कसे?
सकाळ होईपर्यंत झोप येत नाही, कूस बदलत राहता? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं, देसी टॉनिक, येईल सुखाची झोप!
Beauty Feature : फिल्टरसारखा लूक तेही मेकअपमधून!; जाणून घ्या ब्लरिंग मेकअप, लग्नाच्या सिझनमध्ये खूप येईल कामी!!
नशेखोराचा कहर : आधी लिफ्ट मागितली, नंतर रस्‍त्‍यात गाडी थांबवून दारू पिण्यासाठी पैसे मागत १८ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, मनपा आयुक्‍तांच्या निवासस्थानाजवळील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software