छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४ भीषण अपघात; ४ ठार; माजी सैनिकासह ठेकेदाराचा मृतांत समावेश

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यात २४ तासांत ४ भीषण अपघात घडले. यात चौघांचा मृत्‍यू झाला असून, मृतांत माजी सैनिकासह ठेकेदाराचा समावेश आहे. हे अपघात नगरनाका, सोलापूर-धुळे महामार्गावरील निपाणी फाट्यासह पाचोड व शिऊर परिसरात घडले. भरधाव बसने ऑटो रिक्षाला मागून धडक दिली. यात माजी सैनिक गौतम आनंद पगारे (वय ६३, रा. पडेगाव) यांचा जागीच मृत्‍यू […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यात २४ तासांत ४ भीषण अपघात घडले. यात चौघांचा मृत्‍यू झाला असून, मृतांत माजी सैनिकासह ठेकेदाराचा समावेश आहे. हे अपघात नगरनाका, सोलापूर-धुळे महामार्गावरील निपाणी फाट्यासह पाचोड व शिऊर परिसरात घडले.

भरधाव बसने ऑटो रिक्षाला मागून धडक दिली. यात माजी सैनिक गौतम आनंद पगारे (वय ६३, रा. पडेगाव) यांचा जागीच मृत्‍यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी (३ ऑक्‍टोबर) पहाटे साडेपाचला नगर नाक्याजवळ घडली. पगारे हे महार रेजिमेंटचा भाग होते. १ ऑक्टोबरला लष्करातर्फे महार रेजिमेंट स्थापना दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त पुण्यातदेखील लष्करातर्फे कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पगारे कुटुंबासह सहभागी झाले होते.

पुण्यावरून गुरुवारी पहाटे ते परतले. ऑटोने घरी निघाले. नगर नाक्याजवळ भरधाव बसने त्यांच्या रिक्षाला मागून जोरात धडक दिली. यात रिक्षाचालकासह गौतम यांचे कुटुंब जखमी झाले. गंभीर जखमी होऊन गौतम यांचा मृत्यू झाला. छावणी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे. गौतम पगारे हे स्‍कूलबस चालवात होते. याच नोकरीतून त्‍यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. अपघातातून त्‍यांच्या दोन पत्‍नी आणि बहीण बालंबाल बचावली.

दुचाकी दुभाजकाला धडकून कंत्राटदराचा मृत्‍यू
दुचाकी दुभाजकाला धडकून जय भवानीनगरमधील पांडुरंग भानुदास पाटील (४२) यांचा मृत्‍यू झाला. ते कंत्राटदार होते. हा अपघात सोलापूर- धुळे महामार्गावर निपाणी परिसरात बुधवारी (२ ऑक्‍टोबर) रात्री घडला. ते भागीदारीत शैक्षणिक ऑनलाइन क्लासेसदेखील घेत होते. बुधवारी रात्री क्लासेसवरून ते निपाणी परिसरात गेले होते. तेथून परतताना त्यांची दुचाकी अचानक दुभाजकाला धडकली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. सव्वा महिन्यापूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले आहेत. त्यांना त्या परिसरात बोलावून काहींनी अपघात घडवून आणल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केल्याने अपघाताबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

पाचोड, शिऊरजवळील अपघात…
पैठण तालुक्‍यातील पाचोडजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गुलाबसिंग घायडक (वय ७८) यांचा मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास हा अपघात घडला. त्यांना धडक देऊन वाहनचालकाने पोबारा केला. वैजापूर तालुक्‍यातील शिऊर परिसरात भरधाव वाहनाने गणेश अंबादास आवारे (४०, रा. वैजापूर) यांना उडवून पोबारा केला. गंभीर जखमी झालेल्या आवारे यांचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्‍यान बुधवारी रात्री ११ वाजता मृत्यू झाला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software