- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरात ३ भीषण अपघात; हॉटेल व्यावसायिकासह तिघांचा मृत्यू, भरधाव ट्रक बनून आले ‘काळ’
छत्रपती संभाजीनगरात ३ भीषण अपघात; हॉटेल व्यावसायिकासह तिघांचा मृत्यू, भरधाव ट्रक बनून आले ‘काळ’
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (१० नोव्हेंबर) सायंकाळी पावणेसहाला पिंप्रीराजा -कचनेर प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. हॉटेल व्यावसायिक कृष्णा प्रकाश दहीहंडे (वय २८, रा. हनुमान चौक चिकलठाणा) व रामेश्वर जनार्दन गोरे (वय ५४, रा. डायगव्हाण, ता. छत्रपती संभाजीनगर) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. कृष्णा यांचे […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (१० नोव्हेंबर) सायंकाळी पावणेसहाला पिंप्रीराजा -कचनेर प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.
सोलापूर-धुळे महामार्गाने सोलापूरवरून बॉयलर कंपनीचा भुसा घेऊन धुळ्याकडे जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल होऊन उड्डाणपुलाच्या खांबाला धडकला. यात चालक आनंद कुमार (वय २२, रा. तामिळनाडू) याचा जागीच मृत्यू झाला. रविवारी दुपारी कांचनवाडी उड्डाणपुलाखाली हा अपघात घडला. ट्रकचा ब्रेक अचानक निकामी झाल्याने आनंद यांचा स्टिअरिंगवरचा ताबा सुटल्याचे सांगण्यात आले. ट्रक चक्काचूर झाला आहे. ट्रकचा क्लिनर मनिम मुर्गन गंभीर जखमी आहे. त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी ते तामिळनाडू येथून निघाले होते. आनंद कुमारला जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढावे लागले. हा ट्रक अन्य कोणत्या वाहनांना धडकला नाही अन्यथा मोठी जीवित हानी झाली असती.
ट्रकच्या धडकेने आयशरचालक गंभीर जखमी
समृद्धी महामार्गाने इस्माईल शमीम खान (वय ३८, रा. मुंबई) हे मुंबईवरून आयशरमधून अमरावतीच्या दिशेने टोमॅटो घेऊन जात असताना रविवारी पहाटे १२:३० वाजता (मध्यरात्री) ट्रकचालकाने (एमएच – १५ – एफ व्ही – ७८८२) त्यांना मागून धडक दिली. यात आयशर टेम्पो दूर फेकला जाऊन ईस्माईल यांचा पाय तुटून ते गंभीर जखमी झाले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

