- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरात २ खून; भावसिंगपुऱ्यात अनैतिक संबंधातून प्रेयसीने प्रियकराला दगडाने ठेचले, वडगाव
छत्रपती संभाजीनगरात २ खून; भावसिंगपुऱ्यात अनैतिक संबंधातून प्रेयसीने प्रियकराला दगडाने ठेचले, वडगाव कोल्हाटीत गोळ्या झाडून युवकाची हत्या!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरात गेल्या १५ दिवसांतील पाचवा खून आज, १९ जुलैला घडला आहे. दोन दिवसांपूर्वी भावसिंगपुऱ्यात प्रेयसीने भाऊ व दुसऱ्या प्रियकराला हाताशी धरून पहिल्या प्रियकराचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना बुधवारी (१७ जुलै) मध्यरात्री समोर आल्यानंतर आज पहाटे कपिल पिंगळे (रा. रांजणगाव शेणपुंजी) या युवकाची गोळ्या झाडून हत्या झाल्याच्या घटनेने वाळूज […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरात गेल्या १५ दिवसांतील पाचवा खून आज, १९ जुलैला घडला आहे. दोन दिवसांपूर्वी भावसिंगपुऱ्यात प्रेयसीने भाऊ व दुसऱ्या प्रियकराला हाताशी धरून पहिल्या प्रियकराचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना बुधवारी (१७ जुलै) मध्यरात्री समोर आल्यानंतर आज पहाटे कपिल पिंगळे (रा. रांजणगाव शेणपुंजी) या युवकाची गोळ्या झाडून हत्या झाल्याच्या घटनेने वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटी पुन्हा हादरले. तिसगाव – वडगाव कोल्हाटी मार्गावर साईबाबा चौकात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह कचरा टाकण्यासाठी आलेल्या महिलांना पहाटे दिसल्यानंतर खळबळ उडाली.
४४ वर्षीय दगडू मुरलीधर सदाफुले (रा. पाण्याच्या टाकीजवळ, पेठेनगर, भीमनगर, भावसिंगपुरा) हे कौटुंबिक वादामुळे पत्नी, १९ वर्षीय मुलगा व २२ वर्षीय मुलगी यांच्यापासून विभक्त राहत होते. दगडू यांचे भाऊ कडुबा यांनी तक्रारीनुसार, परिसरातच राहणाऱ्या निर्मला गायकवाड यांच्यासोबत दगडू यांचे प्रेमसंबंध होते. निर्मलादेखील कुटुंबापासून वेगळी राहत होती. तिचे कैलास देवरेसोबतही प्रेमसंबंध जुळले होते. १७ जुलैला मध्यरात्री दगडू निर्मलाबाईच्या घरी गेला असता तिथे तिचा भाऊ बाळू निकाळजे आणि कैलास देवरे आधीपासूनच बसलेले होते. तिघांनी दगडूला बेदम मारहाण करत दगडाने ठेचून त्याचा खून केला. आरडाओरडा ऐकून नागरिकांनी छावणी पोलिसांना कळवले. पोलिसांनी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दगडू यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोके व छातीला गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर, पोलीस उपनिरीक्षक सोपान नरळ यांनी घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या निर्मला, बाळू व कैलासला लगेचच अटक केली.
गोळ्या झाडून ३३ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने वाळूज एमआयडीसी शुक्रवारी (१९ जुलै) पहाटे हादरली. खुन्याने पाठीत घातलेली गोळी छातीतून बाहेर निघाली होती. कपिल सुदाम पिंगळे (वय ३३, रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी) असे हत्या झालेल्याचे नाव असून, तो मूळचा नांदेड जिल्ह्यातील कारेगावचा (ता. धर्माबाद) आहे. कपिलचे वडील रोजगारासाठी वाळूज एमआयडीसीत येऊन पुढे रांजणगाव शेणपुंजीत स्थायिक झाले होते. कपिलचे लॉज- हॉटेल आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असायचा. वर्चस्ववादातून त्यांचे स्थानिकांशी खटके उडत असल्याने या हत्येला राजकीय किनार असल्याची चर्चा असून, आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचाही संशय आहे. या प्रकरणात कपिलचे वडील सुदाम पिंपळे यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात यश फत्तेलष्करसह अन्य तिघांनी खून केल्याची तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, यशचा शोध घेतला जात आहे. गुरुवारी मध्यरात्री कपिल आणि मारेकरी यांच्यात ओली पार्टी झाली. पार्टीत मारेकऱ्यांनी त्याला दारू पाजून पूर्णपणे नशेत असल्याची खात्री करून कारमध्ये बसवले. रस्त्यात त्याच्यावर गोळ्या झाडल्या. नंतर मृतदेह वडगाव कोल्हाटीजवळील साईबाबा चौकालगत टाकला. साईनगर सिडकोतील महिला शुक्रवारी कचरा टाकण्यासाठी गेल्या असता त्यांना हा मृतदेह दिसल्यानंतर खळबळ उडाली. मृतदेहाजवळच गावठी कट्टा आणि गोळीबार केल्यानंतर रिकाम्या झालेल्या गोळीची पुंगळी आढळली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

