छत्रपती संभाजीनगरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दुपारी १ ला सभा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील महायुतीच्या १४ उमेदवारांच्या प्रचारासाठी आज, १४ नोव्‍हेंबरला दुपारी १ वाजता चिकलठाणा एमआयडीसीतील ग्रॅहम फर्थच्या मैदानावर देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह महायुतीचे राज्‍यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. दुपारी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील महायुतीच्या १४ उमेदवारांच्या प्रचारासाठी आज, १४ नोव्‍हेंबरला दुपारी १ वाजता चिकलठाणा एमआयडीसीतील ग्रॅहम फर्थच्या मैदानावर देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह महायुतीचे राज्‍यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

दुपारी नरेंद्र मोदी विमानाने चिकलठाणा विमानतळावर येतील. तिथून थेट सभास्थळी दाखल होतील. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या सभेचे नियोजन भाजपतर्फे चार दिवसांपासून सुरू आहे. सभेसाठी जर्मन हँगर भव्य दिव्य मंडप उभारण्यात आला आहे. वादळवारा आला तरी हा मंडप हालत नाही. दोन्ही जिल्ह्यांतील १४ मतदारसंघांतील महायुतीचे उमेदवार आणि तेथील सुमारे १ लाखांहून अधिक नागरिक सभेला येण्याची शक्‍यता भाजप शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी व्यक्‍त केली. सभेच्या अनुषंगाने भाजपचे दिग्गज नेते बुधवारपासूनच शहरात तळ ठोकून आहेत. सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार डॉ. भागवत कराड, आमदार पंकजा मुंडे, महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यासह महायुतीचे राज्यासह मराठवाड्यातील नेते उपस्थित राहणार आहेत.

मोदी यांच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २१३ अधिकारी आणि १६५८ पोलीस कर्मचारी तैनात असतील. यात पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार, ग्रामीण पोलीस अधीक्षकांसह ९ पोलीस उपायुक्‍त, १२ सहायक पोलीस आयुक्‍त, ४० पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे १५२ अधिकारी आणि १४४९ कॉन्‍स्‍टेबल आणि २०९ महिला पोलिसांचा यात समावेश आहे. केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्याही निवडणुकीसाठी दाखल आहेत. त्‍यांचीही वेळप्रसंगी मदत घेतली जाऊ शकते. पोलिसांनी सभेमुळे वसंतराव नाईक कॉलेज ते केंब्रीज चौक दुपारी १२ ते ४ या वेळेत सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software