छत्रपती संभाजीनगरात चोरट्यांचा धुमाकूळ!; मंगळसूत्र, मोबाइल हिसकावणे, घर-दुकाने फोड्यांसोबत आता मंदिरेही चोरट्यांच्या निशाण्यावर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मंगळसूत्र चोरांच्या उचापत्या कमी होत नसताना, एकट्यादुकट्या व्यक्‍तीला पाहून लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. दुकाने, घरे फोडण्याबरोबरच चोरट्यांनी मंदिरेही लक्ष्य केली असून, दुसरीकडे चोरट्यांचे हे आव्हान पोलीस गांभीर्याने घेत नसल्याची टीका सामान्यांतून व्यक्‍त होत आहे. चोरट्यांनी शहरात अक्षरश: दहशत निर्माण केली आहे. हडको एन १२ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मंगळसूत्र चोरांच्या उचापत्या कमी होत नसताना, एकट्यादुकट्या व्यक्‍तीला पाहून लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. दुकाने, घरे फोडण्याबरोबरच चोरट्यांनी मंदिरेही लक्ष्य केली असून, दुसरीकडे चोरट्यांचे हे आव्हान पोलीस गांभीर्याने घेत नसल्याची टीका सामान्यांतून व्यक्‍त होत आहे. चोरट्यांनी शहरात अक्षरश: दहशत निर्माण केली आहे.

हडको एन १२ मधील हिंगलाज माता मंदिर फोडून चोरट्यांनी दानपेटीतील रोख रकमेसह देवीचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी (२७ नोव्‍हेंबर) सकाळी समोर आली. या प्रकरणात सचिन मोहन बोबले (वय ४४, रा. एन १२ बी सेक्टर, हडको) यांनी तक्रार दिली आहे. ते अभ्यासिका चालवतात. त्‍यांच्या घराच्या थोड्या अंतरावर कॉलनीत रोडवर हिंगलाज माता मंदिर आहे. मंदिराच्या तळमजल्यावर त्‍यांची जय बजरंग नावाची अभ्यासिका आहे.

त्‍यांनी मंगळवारी रात्री ९ ला नेहमीप्रमाणे हिंगलाज माता मंदिर बंद केले. गुरुवारी सकाळी साडेसातला मंदिर आणि अभ्यासिका उघडण्यासाठी आले असता मंदिराला लावलेले कुलूप खाली पडलेले दिसले. त्‍यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पाहिले असता गाभाऱ्यातील मंदिराचे कुलूप तुटलेले होते. दानपेटीचेही कुलूप तुटलेले होते. दानपेटीतील रक्कम, देवीच्या गळ्यातील सोन्याची पोत, डोक्यातील चांदीचा मुकूट, पंचधातूचे कासव, गदा, तलवार, त्रिशूळ, चक्र असे चोरीला गेल्याचे दिसले.

चोरीला गेलेला मुद्देमाल…
दानपेटीतील ८ हजार रुपये, २५ हजार रुपयांची देवीची सोन्याची पोत, ३० हजार रुपयांचा चांदीचा मुकूट, १० हजार रुपये किंमतीचे पंचधातूचे कासव, गदा, तलवार, त्रिशूळ, चक्र आदी एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. सिडको पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन पंचनामा केला. श्वानपथकाकडून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्‍न केला, पण उपयोग झाला नाही. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल नानेकर करत आहेत.

मोबाइल हिसकावून दुचाकीवरून ठोकायचा धूम…
नंदकुमार बळीराम नंदनवरे (वय २४, रा. अजिज कॉलनी, नारेगाव) याने सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तो न्यू मॉर्डन कॉलेजमध्ये बी.सी.ए.चे शिक्षण घेतो. बुधवारी (२७ नोव्‍हेंबर) रात्री पावणेआठला क्लास करून रूमकडे जात असताना साठे चौक टीव्ही सेंटर रोडने फोनवर बोलत जात होता. मागून एक दुचाकी आली. त्‍यावर मागे बसलेल्या व्यक्‍तीने नंदकुमारचा मोबाइल बळबरीने हिसकावला. ते हिमायतबागेच्या रस्त्याकडे निघून गेले. नंदकुमारने मित्राला बोलावून घेतले. दोघे सिडको पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेले. तिथून नंदकुमारने चोरी गेलेल्या मोबाइलवर कॉल केला असता एका व्यक्‍तीने कॉल उचलला.

त्याने त्याचे नाव शेख फैजान युनूस असे सांगून सांगितले की, आम्ही एका गाडीवर दोन माणसे पकडली आहेत. त्यामधून एक माणूस पळून गेला आहे. दुसऱ्याला आम्ही पकडून ठेवले असून ते दोघे मोबाइल हिसकावून घेत होते. त्यांनी माझासुद्धा फोन हिसकावला होता. त्याच्याकडे तुझासुद्धा फोन आहे. आम्ही त्या व्यक्‍तीला सिडको पोलीस ठाण्यात घेऊन येत आहोत. त्यानंतर काही वेळाने फैजान युनूस शेख, मोईन बशीर शेख हे त्‍या चोरट्याला सिडको पोलीस ठाण्यात घेऊन आले. पोलिसांनी चोरट्याला नाव विचारले असता त्याने त्याचे नाव संभाजी किसन सोनगिरे (वय १९, रा. साजापूर ता. छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. त्‍याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ३५ हजार रुपयांचो ५ मोबाइल मिळून आले. पोलिसांनी मोबाइल जप्त करून त्‍याला अटक केली. अधिक तपास पोलीस अंमलदार भाऊसाहेब जगताप करत आहेत.

सराफा दुकान फोडून दीड लाखांचे दागिने लांबवले
छत्रपती संभाजीनगर शहराजवळील चितेगाव येथील सराफा दुकान फोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी (२६ नोव्‍हेंबर) पहाटे घडली. किसन मंगलदास जव्हेरी यांच्या मालकीचे मंगलदास ज्वेलर्स दुकान आहे. शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. १ लाख ४९ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना सकाळी समोर आल्यानंतर बिडकीन पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. श्वानपथकाने चोरट्यांचा दूरपर्यंत माग काढला. परंतु नंतर श्वास थबकले. चोरट्यांविरुद्ध बिडकीन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वैजापुरात महिला पोलिसाचे घर फोडून दीड लाख लांबवले…
वैजापूर तालुक्यातील शिवराई येथे महिला पोलिसाच्या घरातून दीड लाख रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले. ही घटना मंगळवारी (२६ नोव्‍हेंबर) सकाळी घडली. शिवराई शिवारातील शेतात तलाठी विक्रम रावसाहेब वरपे हे त्यांच्या पोलीस कर्मचारी असलेल्या पत्नीसोबत राहतात. दोघेही पती-पत्नी ड्यूटीवर असल्याने घरी कोणीही नव्हते. याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून पेटीतील दीड लाख रुपये चोरून नेले. सायंकाळी दाम्‍पत्‍य घरी आले असता चोरी झाल्याचे समोर आले. तलाठी विक्रम वरपे यांच्या तक्रारीवरून चोरट्याविरुद्ध वैजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software