छत्रपती संभाजीनगरात गोदामाला भीषण आग, पहाटे ३ पर्यंत धग कायम…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगावमधील ममतानगरातील गोदामाला भीषण आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना मध्यरात्री १२ च्या सुमारास घडली. आग पूर्णपणे विझवायला पहाटेचे ३ वाजले. अग्‍निशमन विभागाचे ४ बंब आणि टँकरने आग विझविण्यात आली. आग लागलेले गोदाम अनधिकृत असून पूर्णपणे रहिवासी वसाहतीत आहे. एका गोदामाला आग लागल्यानंतर आजूबाजूची तीन-चार गोदामेही आगीत […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगावमधील ममतानगरातील गोदामाला भीषण आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना मध्यरात्री १२ च्या सुमारास घडली. आग पूर्णपणे विझवायला पहाटेचे ३ वाजले. अग्‍निशमन विभागाचे ४ बंब आणि टँकरने आग विझविण्यात आली. आग लागलेले गोदाम अनधिकृत असून पूर्णपणे रहिवासी वसाहतीत आहे. एका गोदामाला आग लागल्यानंतर आजूबाजूची तीन-चार गोदामेही आगीत सापडली. त्‍यामुळे आग प्रचंड वाढली. ही आग रहिवासी वसाहतीपर्यंत गेली असती तर मोठी जिवीत हानी होण्याची शक्‍यता होती. दोन वर्षांपूर्वीही अशाचप्रकारे आग लागल्यानंतर अग्‍निशमन विभागाने नोटिसा दिल्या होत्‍या. मात्र त्‍यानंतरही ही गोदामे तशीच आहेत, अशी माहिती या भागातील नागरिकांनी छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूजशी बोलताना दिली.

मध्यरात्री १२ ला आग लागली. लाकडे, पुठ्ठे, बाटल्यांचे गोदाम असल्याने आगीने लगेचच रौद्ररुप धारण केले. सव्वा बाराला अग्‍निशमन विभागाला कॉल आला. चिकलठाणा, चिकलठाणा, सिडको, एन-९ आणि पदमपुरा येथील एकूण ४ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्‍यांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्‍न सुरू केले. पहाटे ३ पर्यंत आग आटोक्‍यात आली. आग विझविण्यासाठी उपअग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, ड्यूटी इन्चार्ज सोमीनाथ भोसले, फायरमन शुभम शिरखे, साळुंके, आराख, विनोद तुपे यांच्यासह जवानांनी मेहनत घेतली. सुदैवाने एवढ्या भीषण आगीत कोणालाही कोणतीही दुखापत झाली नसल्याचे अग्‍निशमन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software