छत्रपती संभाजीनगरात गणेशोत्सवात महिला सुरक्षेसाठी पोलीस दक्ष!; दिदी पथकाची पायी गस्त, मंडळाच्या परिसरात असणार कायम पोलीस

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गणेशोत्सवात महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस दक्ष असणार आहेत. प्रत्येक ठिकाणी, मंडळाच्या परिसरात पोलीस कायम असणार आहेत. दिदी पथक पायी गस्त घालणार असून, टवाळखोरी करताना कुणी दिसला तर खैर नाही. गणेशोत्सवात छेडछाड रोखण्याची जबाबदार आपण घेतली पाहिजे, अशी स्पष्ट सूचनाच विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांना केली आहे. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गणेशोत्सवात महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस दक्ष असणार आहेत. प्रत्येक ठिकाणी, मंडळाच्या परिसरात पोलीस कायम असणार आहेत. दिदी पथक पायी गस्त घालणार असून, टवाळखोरी करताना कुणी दिसला तर खैर नाही. गणेशोत्सवात छेडछाड रोखण्याची जबाबदार आपण घेतली पाहिजे, अशी स्पष्ट सूचनाच विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांना केली आहे.

उद्या, ७ सप्‍टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. त्‍यासंदर्भाने सुरक्षा आढावा बैठक श्री. मिश्र यांनी घेतली. या वेळी पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर अधीक्षक सुनील कृष्णा लांजेवार उपस्थित होते. ठाणे प्रभारींनी विसर्जन मिरवणूक मार्गावर स्वतः पायी फिरून पाहणी करावी. काही बदल हवे असल्यास संबंधित विभागाला कळवावे व ते करून घ्यावेत. जनसंपर्क वाढवा, अधिकाधिक नागरिकांच्या संपर्कात राहा, असेही श्री. मिश्र यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड म्हणाले, की गणेशोत्सव अत्यंत महत्त्वाची सामाजिक जबाबदारी असलेला सण आहे. तरुणांनी एक गाव एक गणपतीसाठी पुढाकार घ्यावा. श्रींच्या दर्शनासाठी पुरुष, महिलांची दर्शन रांग वेगळी ठेवा. दर्शनासाठी प्रवेश व बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले. सोशल मीडियावर अनेकदा वादग्रस्त पोस्ट शेअर होतात. आपण सतर्क राहावे. तरुणांनी त्याला प्रतिसाद देऊ नका. तशा पोस्टवर व्यक्तही होऊ नये. आपल्या एका छोट्या चुकीमुळे चांगली नोकरी, व्यावसायिक संधीपासून मुकण्याची वेळ येईल, असे इशाराही अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी तरुणाईला दिला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software