छत्रपती संभाजीनगरमध्ये मदरशातून दोन मुलांचे अपहरण झाल्याने खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : देवळाई चौकातील मदरशातून २ मुलांचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. सातारा पोलीस ठाण्यात शिक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणकर्त्याविरुद्ध रविवारी (११ मे) गुन्हा दाखल केला आहे. मुलांच्या मामावर संशय असून, त्‍यानेच टोस्ट, बिस्कीट घेऊन देतो, असे सांगून मोटारसायकलीवर बसवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अपहरण झालेल्या एका मुलाचे वय ९ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : देवळाई चौकातील मदरशातून २ मुलांचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. सातारा पोलीस ठाण्यात शिक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणकर्त्याविरुद्ध रविवारी (११ मे) गुन्हा दाखल केला आहे. मुलांच्या मामावर संशय असून, त्‍यानेच टोस्ट, बिस्कीट घेऊन देतो, असे सांगून मोटारसायकलीवर बसवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अपहरण झालेल्या एका मुलाचे वय ९ आणि दुसऱ्याचे १० आहे. एक जटवाडा रोड सईदा कॉलनीतील असून, दुसऱ्या देवळाई रोड कौसर पार्कचा रहिवासी आहे. ६ मे रोजी सकाळी साडेआठला शिक्षकांनी मुलांची हजेरी घेतली असता दोन मुले गैरहजर होते. शिक्षकांनी अपहरण झालेल्या एका मुलाच्या मोठ्या भावाला विचारले असता त्याने सांगितले, की सकाळी सातला आमचे मामा अनिस खान खलील खान ऊर्फ बाबा (रा. सईदा कॉलनी, जटवाडा रोड, छत्रपती संभाजीनगर) हा मदरसामध्ये आला. त्याने दोघांना टोस्ट, बिस्कीट घेऊन देतो, असे म्हणून मोटारसायकलीवर बसवून नेले.

सर्वांनी दुपारपर्यंत दोन्ही मुले परतण्याची वाट पाहिली. पण ते आलेच नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी मुलांच्या वडिलांना कळवले असता त्यांनी सांगितले, की तुम्ही काही काळजी करू नका. तो संध्याकाळपर्यंत दोन्ही मुलांना घेऊन मदरशात येईल. मात्र अनिस खान मुलांना घेऊन आला नाही. त्यामुळे दोन्ही मुलांचा सर्वांनी मिळून आजूबाजूच्या परिसरात, मित्राकडे, नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र दोघेही मिळून आले नाहीत. अखेर अनिस खानने दोन्ही मुलांना अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली. अधिक तपास पोलीस अंमलदार तुकाराम सोनुने करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software