चोरट्यांनी हद्दच केली… उस्मानपुऱ्यातून दोन महागड्या कार चोरीला, तिसऱ्या कारचे महत्त्वाचे पार्ट्‌स काढून नेले!; छ. संभाजीनगरात खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात पुन्हा हायटेक किटने कार चोरी करणारी टोळी सक्रिय झाली असून, उस्मानपुऱ्यातून दोन महागड्या कार चोरीला गेल्या आहेत. तिसरी कारही चोरीचा प्रयत्न झाला, पण त्यात चोरट्यांना यश आले नाही, मग त्या कारचे महत्त्वाचे पार्ट्‌स त्यांनी काढून नेले. या घटना मंगळवारी (२७ ऑगस्ट) सकाळी समोर आल्या. उस्मानपुरा पोलिसांनी कारचोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात पुन्हा हायटेक किटने कार चोरी करणारी टोळी सक्रिय झाली असून, उस्मानपुऱ्यातून दोन महागड्या कार चोरीला गेल्या आहेत. तिसरी कारही चोरीचा प्रयत्न झाला, पण त्यात चोरट्यांना यश आले नाही, मग त्या कारचे महत्त्वाचे पार्ट्‌स त्यांनी काढून नेले. या घटना मंगळवारी (२७ ऑगस्ट) सकाळी समोर आल्या. उस्मानपुरा पोलिसांनी कारचोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आर्थिक सल्लागार प्रशांत शिंदे (वय ४७, रा. एन ४, सिडको) यांचे उस्मानपुऱ्यातील जयनगरमधील कुमुद अपार्टमेंटमध्ये कार्यालय आहे. सोमवारी (२६ ऑगस्ट) सायंकाळी त्यांनी त्यांची ह्युंदाई अल्काझार कार (क्र. एमएच २० एफवाय ४९०७) कार्यालयासमोर उभी करून दुचाकीने घरी गेले. मंगळवारी सकाळी ते कार्यालयात आले असता कार दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता जवळच राहणारे व्यावसायिक महेश मुकेश सेहगल (वय ४३, लिलावन अपार्टमेंट, जयनगर) यांची क्रेटा कारही (एमएच २० डीजे ८५२६) चोरीला गेल्याचे समोर आले.

याशिवाय जयंत हरिदास सोनी (वय ६२, रा. प्रतापनगनर, उस्मानपुरा) यांची क्रेटा कारही चोरीचा प्रयत्न झाला, पण चोरट्यांना यश आले नाही. मग त्‍यांनी म्युझिक सिस्टम पॅनल व अन्य महत्त्वाचे पार्ट्‌स चोरून नेले. या प्रकरणात प्रशांत शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे करत आहेत. चोरट्यांनी मंगळवारी पहाटे २ ते २.३० दरम्यान (मध्यरात्री) ही चोरी केल्याचे दिसून येत आहे. ते क्रेटा कारने आले होते. त्यांच्यासोबत दुचाकीवर साथीदार होते. त्यांनी कार चोरीसाठी हायटेक किटचा वापर केला आहे. या किटद्वारे कारचा इंजिन कोड स्कॅन करून विशिष्ट सॉफ्टवेअरच्या मदतीने कारचे लॉक उघडतात. नंतर कारचे सेन्सर व जीपीएस बंद करून बनावट चावीने कार सुरू करून पसार होतात.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software