- News
- सिटी क्राईम
- चिमुकल्यासमोर २३ वर्षीय विवाहितेने घेतला गळफास, पतीसोबत कौटुंबिक वादाचे कारण, पिसादेवीत सलग दुसरी घट...
चिमुकल्यासमोर २३ वर्षीय विवाहितेने घेतला गळफास, पतीसोबत कौटुंबिक वादाचे कारण, पिसादेवीत सलग दुसरी घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीसोबत कौटुंबिक वादातून २३ वर्षांच्या विवाहितेने दीड वर्षीय चिमुकल्यासमोर गळफास घेतल्याची धक्कादायक घटना पिसादेवी भागात घडली. सोमवारी (१ जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास तिने गळफास घेतला होता, गुरुवारी (४ जुलै) मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरती सचिन शिंदे (वय २३, रा. पळशी, ता. छत्रपती संभाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. […]
सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीसोबत कौटुंबिक वादातून २३ वर्षांच्या विवाहितेने दीड वर्षीय चिमुकल्यासमोर गळफास घेतल्याची धक्कादायक घटना पिसादेवी भागात घडली. सोमवारी (१ जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास तिने गळफास घेतला होता, गुरुवारी (४ जुलै) मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याच आठवड्यात पिसादेवीत सलग दुसरी आत्महत्येची घटना घडल्याने रहिवासी सुन्न झाले आहेत. मंगळवारी (२ जुलै) सायंकाळी स्वयंपाकघरात ३७ वर्षीय कांचन देवीदास निकम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पती आणि मुलगा हॉलमध्ये बसलेले असताना त्यांना चहा तयार करून आणते, असे सांगून त्या स्वयंपाकघरात गेल्या अन् टोकाचे पाऊल उचलले होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
16 Mar 2026 16:13:44
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...

