चितेगावच्या व्हेरॉक कंपनीत एका चहाने केला राडा… दोन महिलांत जोरदार ढिश्यूमऽऽ ढिश्यूमऽऽ, एक रक्‍तबंबाळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरातील चितेगाव एमआयडीसीतील व्हेरॉक कंपनीत एका चहामुळे दोन महिलांत मोठाच राडा झाला. चहा घेताना चुकून धक्‍का लागल्यानंतर दोघींत जुंपली. एकमेकींच्या अंगावर कपातले चहा फेकले. त्‍यानंतर तुंबळ हाणामारी सुरू झाली. एकीने प्लास्टिकची वस्‍तू डोक्‍यात घातल्याने दुसरी रक्‍तबंबाळ झाली. ही खळबळजनक घटना मंगळवारी (१९ नोव्‍हेंबर) सकाळी ९ च्या सुमारास घडली. गुरुवारी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरातील चितेगाव एमआयडीसीतील व्हेरॉक कंपनीत एका चहामुळे दोन महिलांत मोठाच राडा झाला. चहा घेताना चुकून धक्‍का लागल्यानंतर दोघींत जुंपली. एकमेकींच्या अंगावर कपातले चहा फेकले. त्‍यानंतर तुंबळ हाणामारी सुरू झाली. एकीने प्लास्टिकची वस्‍तू डोक्‍यात घातल्याने दुसरी रक्‍तबंबाळ झाली. ही खळबळजनक घटना मंगळवारी (१९ नोव्‍हेंबर) सकाळी ९ च्या सुमारास घडली. गुरुवारी (२१ नोव्‍हेंबर) या प्रकरणात जखमी महिलेने तक्रार दिल्यावरून पोलिसांनी दुसऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विद्या राठोड (रा. बिडकीन, ता. पैठण) असे संशयित महिलेचे नाव आहे. जखमी २८ वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, काजल (नाव बदलले आहे) व्हेरॉक कंपनीत चार महिन्यांपासून काम करते. तिची नणंदसुद्धा याच कंपनीत कामाला आहे. दोघी कंपनीच्या बसमध्ये छत्रपती संभाजीनगर ते चितेगाव येणे जाणे करतात. काजलची ड्युटी सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत असते. ती व्हेरॉक कंपनीत पोस्ट मोल्डींग या विभागात कामाला आहे. तिच्यासोबत संशयित विद्या राठोड (रा. बिडकीन) हीसुध्दा कामाला आहे. १९ नोव्‍हेंबरला सकाळी सातच्या सुमारास काजल आणि तिची नणंद नेहमीप्रमाणे कंपनीत कामाला आल्या.

कामादरम्‍यान सकाळी ९ ला रोजच्या प्रमाणे चहाची वेळ झाली असता काजल आणि सोबतचे सर्व जण चहा घेण्यासाठी कंपनीतील चहाच्या टेबलजवळ गेले. काजल कागदी कपात चहा घेऊन मागे वळली तेव्हा विद्या राठोड तिच्यामागे उभी होती. काजल वळल्याने तिचा विद्याला चुकून धक्का लागला. त्यावर विद्या भांडायला लागली. तुला दिसत नाही का?, तू आंधळी झाली आहे का, असे म्‍हणत तिला शिवीगाळ करू लागली. काजलने तिला शिव्या देऊ नको, असे म्‍हटले असता तिने तिच्या हातातील कपातील चहा काजलच्या अंगावर फेकला. त्‍यामुळे काजललाही राग आल्याने तिनेही कपातील चहा तिच्या अंगावर फेकला. त्यानंतर दोघींत बाचाबाची वाढली.

दोघींचे भांडण चालू असताना कंपनीतील वरिष्ठ अधिकारी आले. त्‍यांनी भांडण सोडविले. ते काजलला बाजूला घेऊन जात असताना विद्याने पळत येत टू व्हीलरच्या टणक वस्‍तूने काजलच्या डोक्यात मागून मारले. त्यामुळे काजलचे डोके फुटून रक्त वाहू लागले. तिने मागे वळून पाहिले असता विद्याने पुन्हा तिच्या हातातील वस्‍तूने काजलच्या हातावर मारले. नंतर लाथाबुक्क्यांनी काजलच्या पाठीत, पोटात मारहाण केली. नंतर कंपनीतील वरिष्ठांनी काजलला कंपनीच्या दवाखान्यात नेले. त्यानंतर काजल व तिची सासू तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्या असता पोलिसांनी सरकारी रुग्णालयात आधी उपचार घेण्यास पाठवले. नंतर काजलने येऊन तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी विद्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार दिलीप साळवे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software