चारित्र्यावर संशय; पत्‍नीच्या डोक्‍यात लोखंडी रॉड घालून पाठवले यमसदनी!, छत्रपती संभाजीनगरात तरुणाचे कौर्य

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सासुरवाडीत जाऊन तरुणाने पत्नीची लोखंडी रॉडने हत्या केली. ही थरारक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील महूनगर भागात सोमवारी (१६ डिसेंबर) दुपारी घडली. हत्‍या केल्यानंतर पती फरारी झाला. सातारा पोलिसांनी त्‍याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. ११ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. भारती विठ्ठल वाघ (वय २४) असे हत्‍या झालेल्या विवाहितेचे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सासुरवाडीत जाऊन तरुणाने पत्नीची लोखंडी रॉडने हत्या केली. ही थरारक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील महूनगर भागात सोमवारी (१६ डिसेंबर) दुपारी घडली. हत्‍या केल्यानंतर पती फरारी झाला. सातारा पोलिसांनी त्‍याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. ११ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. भारती विठ्ठल वाघ (वय २४) असे हत्‍या झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

विठ्ठल उत्तम वाघ (वय २८, रा. बोधेगाव, ता. फुलंब्री) असे संशयित पतीचे नाव आहे. सातारा पोलीस ठाण्यात भारतीचे वडील राधाकिसन आसाराम गरबडे (रा. बजाज हॉस्पिटलसमोर, महूनगर) यांनी तक्रार दिली. भारतीचा विवाह जानेवारी २०२४ मध्ये विठ्ठलसोबत झाला होता. लग्नाच्या एक महिन्यानंतर पती-पत्नी कामानिमित्त शहरात येऊन सातारा परिसरात राहत होते. विठ्ठल भारतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्रास देत होता. वाद वाढल्याने दोघे पुन्हा गावी बोधेगावला राहण्यास गेले. मात्र तिथेही भारतीचा छळ करण्यात येत असल्याने भारतीचे वडील ८ डिसेंबरला तिला माहेरी घेऊन आले.

सोमवारी सकाळी भारतीची आई रंजना व भाऊ राहुल आणि वहिनी कामानिमित्त बाहेर गेले होते. वडील बँकेत गेले. भारती व तिच्या भावाची चार वर्षांची मुलगी दोघीच घरी होत्या. त्याचवेळी विठ्ठल १२:३० ते १ च्या सुमारास तिथे आला. भारतीसोबत त्‍याने भांडण सुरू करत लोखंडी रॉड मारून तिचे डोके फोडले. भारती रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर तो पळून गेला. शेजाऱ्यांनी कळवताच तिचे वडील घरी आले. त्यांनी भारतीला घाटी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. भारतीच्या नातेवाइकांनी घाटी रुग्णालयात गर्दी केली. रात्री उशिरा उत्तरीय तपासणी झाल्यानंतर विठ्ठलच्या अटकेच्या मागणीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. सहायक पोलीस आयुक्त रणजित पाटील यांनी नातेवाइकांची समजूत काढली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software