घरात घुसून विवाहितेवर २२ वर्षीय तरुणाचा दोनदा बलात्‍कार, नारेगावमधील खळबळजनक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घरात घुसून २२ वर्षीय तरुणाने विवाहितेवर दोनदा बलात्‍कार केल्याची धक्कादायक घटना नारेगावमध्ये समोर आली आहे. शरीरसंबंधाचा व्हिडीओही तयार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास पतीला व्हिडीओ पाठवेन अशी धमकी त्‍याने दिली. विवाहितेने सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्‍यावरून पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नासेर ऊर्फ अरबाज युनूस शेख […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घरात घुसून २२ वर्षीय तरुणाने विवाहितेवर दोनदा बलात्‍कार केल्याची धक्कादायक घटना नारेगावमध्ये समोर आली आहे.

शरीरसंबंधाचा व्हिडीओही तयार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास पतीला व्हिडीओ पाठवेन अशी धमकी त्‍याने दिली. विवाहितेने सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्‍यावरून पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नासेर ऊर्फ अरबाज युनूस शेख (रा. फातेमानगर, नारेगाव) असे संशयित तरुणाचे नाव आहे. विवाहितेने केलेल्या तक्रारीनुसार, ५ मार्च व १२ मार्चला नासेर तिच्या घरात जबरदस्ती शिरला. तिला धमकी देऊन बलात्‍कार केला. दरम्‍यान, दुसऱ्या एका घटनेत आकाश पांडव (वय ३२, रा. नागेश्वरवाडी) याला सिटीचौक परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी सिटी चौक पोलिसांनी अटक केली आहे. २० सप्टेंबरला दुपारी ४ वाजता मुलगी घरी एकटी असताना आकाश घरात घुसला. तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करून अश्लील चाळे करत धमकावले. त्याच्या त्रासाला कंटाळून मुलगी घर सोडून जालन्यातील आजीकडे राहायला गेली. मुलीच्या वागणुकीत बदल आढळल्याने भावाने तिला विचारपूस केली असता तिने आकाशच्या त्रासाविषयी सांगितले. त्यानंतर या प्रकरणात सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शेख शाकीर यांनी आकाशला अटक केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software