गर्भवतीच्या पोटात लाथा मारल्याने बाळ मृत!; जयभीमनगरातील घटना, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जुन्या वादातून चौघांनी २१ वर्षीय गर्भवती विवाहितेला मारहाण केल्याने पोटातील बाळ मृत्युमुखी पडल्याची घटना १० जुलैला रात्री साडेअकराच्या सुमारास टाऊन हॉल परिसरातील जयभीमनगर भागात घडली. उपचारानंतर रविवारी (१४ जुलै) या प्रकरणात विवाहितेने बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी उत्तम बाळासाहेब येटाळे, आकाश अशोक रामफळे, शिल्पा उत्तम येटाळे, अलका बाबासाहेब […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जुन्या वादातून चौघांनी २१ वर्षीय गर्भवती विवाहितेला मारहाण केल्याने पोटातील बाळ मृत्युमुखी पडल्याची घटना १० जुलैला रात्री साडेअकराच्या सुमारास टाऊन हॉल परिसरातील जयभीमनगर भागात घडली. उपचारानंतर रविवारी (१४ जुलै) या प्रकरणात विवाहितेने बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी उत्तम बाळासाहेब येटाळे, आकाश अशोक रामफळे, शिल्पा उत्तम येटाळे, अलका बाबासाहेब येटाळे (रा. जयभीमनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, विवाहिता जयभीमनगरमध्ये राहते. १० जुलैला रात्री ११:३० वाजता उत्तम, आकाश, शिल्पा व अलकाने तिच्या घरात बळजबरीने प्रवेश केला. तुझा नवरा कुठे आहे, असे विचारत त्यांनी तिच्या सासूला मारहाण सुरू केली. विवाहितेने सासूला वाचवण्यासाठी धाव घेतली असता शिल्पा व अलकाने तिला मारहाण केली. आकाशने पोटावर लाथा मारल्या. यात प्रचंड वेदना होत असल्याने तिने आरडाओरडा केल्याने लोक जमा झाले.

हल्लेखोरांनी तिच्या कानातील सोन्याचा पत्ता हिसकावून घेतला. विवाहितेच्या पतीने तिला ११ जुलैला माहेरी सोडले. त्यांनी तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांच्या तपासणीत पोटातील बाळाचे हृदयाचे ठोके बंद झाल्याचे समोर आले. १३ जुलैला तिने महिलेने मृत मुलाला जन्म दिला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शेषराव खटाणे करीत आहेत. पोलिसांनी उत्तम व आकाशला तत्काळ अटक केली आहे. दोन महिला फरारी झाल्या आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software