विजयनगरातील राजू कापसेच्या खुनाचा अखेर उलगडा; दोघा मित्रांनीच केला घात, एकाला अटक, साथीदार फरारी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : धुळे-सोलापूर महामार्गालगत पांढरी पिंपळगाव शिवारात राजू किसन कापसे (वय ३५, रा. विजयनगर, गारखेडा परिसर) या युवकाचे शिर कापून मृतदेह फेकण्यात आला होता. या खुनाचा उलगडा अखेर झाला असून, दोघा मित्रांनीच राजूचा पाळत ठेवून घात केल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, दुसरा संशयित फरारी आहे. वादातून खून […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : धुळे-सोलापूर महामार्गालगत पांढरी पिंपळगाव शिवारात राजू किसन कापसे (वय ३५, रा. विजयनगर, गारखेडा परिसर) या युवकाचे शिर कापून मृतदेह फेकण्यात आला होता. या खुनाचा उलगडा अखेर झाला असून, दोघा मित्रांनीच राजूचा पाळत ठेवून घात केल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, दुसरा संशयित फरारी आहे. वादातून खून केल्याचे समोर येत असले तरी खरे कारण सखोल चौकशीतच समोर येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती दिली. दत्ता अमृतराव सुरवसे (रा. विजयनगर), संतोष उद्धवराव जगताप (रा. शिवनेरी कॉलनी गारखेडा परिसर) अशी संशयितांची नावे आहेत. संतोषला अटक केली असून, दत्ताचा शोध घेतला जात आहे. पेंटर काम करणारा राजू ८ सप्‍टेंबरला दुपारी चारला कामानिमित्त झाल्टा फाटा येथे जातो, असे पत्‍नीला सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतला नव्हता. तो बेपत्ता झाल्याची तक्रार १० सप्‍टेंबरला त्‍याच्या पत्नीने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्‍याचा मृतदेह पांढरी पिंपळगाव शिवारातील एका हॉटेलमागे आढळला होता. त्‍यामुळे खळबळ उडाली होती. घाटीच्या शवविच्छेदन गृहाबाहेर राजूच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्‍त करत आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्‍यात न घेण्याची भूमिका घेतली होती. सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी आरोपींना लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले होते.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या पथकाने या खुनाचा तपास हाती घेतला. त्यांच्या तपासात राजेशचा काही दिवसांपूर्वी दत्ताशी वाद झाल्याचे समोर आले. या वादातून दत्ता आणि संतोषने राजूचा खून केल्याचेही तपासात समोर आले आहे. दोघांनी राजूची संपूर्ण माहिती घेऊन, त्याचे मित्र, येण्या-जाण्याच्या जागा, कामधंदा असा सर्व तपास केला होता. दोघांनी राजेशची धारदार चाकूने गळा चिरून हत्या करून मृतदेह धुळे-सोलापूर महामार्गालगत फेकून दिला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सिध्देश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, पवन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक दादाराव बनसोडे, रामेश्वर ढाकणे, श्री. थोटे, संजय घुगे, श्रीमंत भालेराव, वाल्मिक निकम, रवी लोखंडे, नरेंद्र खंदारे, संतोष पाटील, अशोक वाघ, योगेश तरमाळे, चालक संजय तांदळे, शिवाजी मदेवाड, श्री. गित्ते, सुनिल गोरे, दादा पवार, संजय जगताप, नागलोत यांनी केला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software