खळबळजनक… घाटीलाही बनावट गोळ्यांचा डोस, १४ हजार गोळ्या रुग्णांच्या पोटात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मे. विशाल एंटरप्रायजेसने क्‍यूरेक्‍सिम-२०० या बनावट औषधी गोळ्या छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातही पुरवल्याचे गुरुवारी (२६ डिसेंबर) समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. ही औषधी बनावट म्‍हणून घोषित झाली, तोपर्यंत १४ हजार ८७२ गोळ्या रुग्णांच्या पोटात गेल्या आहेत. अन्‍न व औषध प्रशासनाच्या हाती अवघ्या १२८ गोळ्या लागल्या, त्‍या त्‍यांनी जप्त केल्या. व्हायरल […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मे. विशाल एंटरप्रायजेसने क्‍यूरेक्‍सिम-२०० या बनावट औषधी गोळ्या छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातही पुरवल्याचे गुरुवारी (२६ डिसेंबर) समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. ही औषधी बनावट म्‍हणून घोषित झाली, तोपर्यंत १४ हजार ८७२ गोळ्या रुग्णांच्या पोटात गेल्या आहेत. अन्‍न व औषध प्रशासनाच्या हाती अवघ्या १२८ गोळ्या लागल्या, त्‍या त्‍यांनी जप्त केल्या.

व्हायरल इन्‍फेक्शनसह विविध प्रकारच्या संसर्ग असलेल्या रुग्णांना ही गोळी दिली जाते. मात्र बनावट गोळी घेतल्याने अपेक्षित परिणाम साध्य होत नाही. शिवाय भेसळ किंवा चुकीचे उत्‍पादन प्रक्रियेचे दोष असल्यास गंभीर दुष्पपरिणाम होत असल्याने बनावट गोळी घेतल्याने या रुग्णांच्या प्रकृतीवरही चिंता व्यक्‍त केली जात आहे. घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे म्‍हणाले, की फार्माकोलॉजी विभागाकडून सविस्तर अहवाल मागवला असून, औषधीचा संपूर्ण वापर थांबविण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूरच्या शासकीय रुग्णालयाला बनावट औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी अन्‍न व औषध प्रशासनाने महाराष्ट्र आणि गुजरातमधील ४ पुरवठादार कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, यात कोल्‍हापूरच्या मे. विशाल एंटरप्रायजेस फर्मचा समावेश आहे. या फर्मचे मालक सुरेश दत्तात्रेय पाटील आहेत. त्‍यांनीच घाटीला बनावट गोळ्या पुरवल्या. या बनावट गोळ्यांचे उत्‍पादन केरळच्या स्‍कायक्‍युअर सोल्‍यूशन्स कंपनीने केले आहे. क्‍यूरेक्‍सिम-२०० या गोळ्यांत क्‍यूरेक्‍सिम हा मुख्य घटकच नाही. केवळ सहायक घटकांसह स्‍टार्च पावडरचा वापर केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software