किती ही नियती निष्ठूर… १० वर्षांनी बाळ झाले, बारसे आटोपून पुण्याला जाताना कारवर स्कॉर्पिओ येऊन धडकली, अपघातात बाळासह आई, आजीचाही मृत्‍यू!!, छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कधी कधी नियती इतकी निष्ठूरपणे वागते, की ती घटना ऐकून, वाचूनच डोके सुन्‍न होऊन जाते. अशीच घटना वाळूजजवळील पथकर नाक्याजवळ (लिंबेजळगावनजिक) पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शुक्रवारी (१३ सप्टेंबर) दुपारी चारला घडली. भरधाव स्कॉर्पिओ नियंत्रण सुटून दुभाजकावरून उडून थेट कारवर धडकली अन्‌ ६ महिन्यांच्या चिमुकल्यासह त्याच्या आई अन्‌ आजीचा (आईची आई) मृत्‍यू […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कधी कधी नियती इतकी निष्ठूरपणे वागते, की ती घटना ऐकून, वाचूनच डोके सुन्‍न होऊन जाते. अशीच घटना वाळूजजवळील पथकर नाक्याजवळ (लिंबेजळगावनजिक) पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शुक्रवारी (१३ सप्टेंबर) दुपारी चारला घडली. भरधाव स्कॉर्पिओ नियंत्रण सुटून दुभाजकावरून उडून थेट कारवर धडकली अन्‌ ६ महिन्यांच्या चिमुकल्यासह त्याच्या आई अन्‌ आजीचा (आईची आई) मृत्‍यू झाला. बाळाचे बारसे आटोपून हे कुटुंब पुण्याला जात होते.

मृणालिनी अजय बेसरकर (वय ३८), आशालता पोपळघट (वय ६५) व सहा महिन्यांचे बाळ यांचा मृत्‍यू झालेल्यांत समावेश आहे, तर अजय अंबादास बेसरकर (वय ४०), शुभांगिनी सागर गिते (वय ३५) व दुर्गा सागर गिते (वय ७) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अमरावती येथील अजय बेसरकर हे पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांची पत्नी मृणालिनी दोन महिन्यांपासून गावाकडे आली होती. चार दिवसांपूर्वी त्यांच्या बाळाचे बारसे झाले. त्यानंतर ते पत्नी मृणालिनी, ६ महिन्यांचे बाळ आणि सासू आशालता, मेहुणी शुभांगिणी, मेहुणीची मुलगी दुर्गा यांच्यासह क्विड कारने (एमएच २७ बीझेड ००४५)अमरावतीवरून पुण्याला जात होते. वाळूजजवळील टोलनाक्‍यापासून काही अंतरावर अहमदनगरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव स्कॉर्पिओच्या (एमएच १२ केजे ४१३४) चालकाचे नियंत्रण सुटून दुभाजकावरून उडून ही स्कॉर्पिओ बेसरकर यांच्या कारवर येऊन धडकली. नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत वाळूज पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जखमींना प्राथमिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर जीपचा चालक व त्याचा साथीदार घटनास्थळावरून पळून गेले होते. पोलिसांनी स्कॉर्पिओचालक उद्धव उर्फ विशाल चव्हाण (रा. बकवालनगर, वाळूज) याला ताब्‍यात घेतले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software