कारने रात्री सुनसान ठिकाणी फिरणाऱ्या तरुण-तरुणीला बंदूकीचा धाक दाखवून तोतया पोलिसाने लुटले!, वळदगाव शिवारातील धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर ( सीएससीएन वृत्तसेवा) : कारने रात्री सुनसान ठिकाणी फिरणाऱ्या तरुण-तरुणीला थांबवून तोतया पोलिसाने बंदुकीचा धाक दाखवून लुटले. त्‍यांच्या अंगठ्या, सोन्याची चैन, रोख रक्‍कम असा एकूण ६२ हजार रुपयांचा ऐवज घेऊन लुटारू पसार झाला. ही खळबळजनक घटना सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वळदगाव शिवारात शनिवारी (२१ सप्टेंबर) रात्री नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी रविवारी (२२ […]

छत्रपती संभाजीनगर ( सीएससीएन वृत्तसेवा) : कारने रात्री सुनसान ठिकाणी फिरणाऱ्या तरुण-तरुणीला थांबवून तोतया पोलिसाने बंदुकीचा धाक दाखवून लुटले. त्‍यांच्या अंगठ्या, सोन्याची चैन, रोख रक्‍कम असा एकूण ६२ हजार रुपयांचा ऐवज घेऊन लुटारू पसार झाला. ही खळबळजनक घटना सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वळदगाव शिवारात शनिवारी (२१ सप्टेंबर) रात्री नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी रविवारी (२२ सप्टेंबर) तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात शहराच्या मध्यवर्ती भागात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. तो २१ जूनला रात्री ९ च्या सुमारास मैत्रिण सिया (नाव बदलले आहे) हिच्यासोबत जेवण करून कारने लिंक रोडने गोलवाडी शिवाराकडून श्रीहरी बिल्डिंगजवळून वळण घेत असताना त्यांच्या कारसमोर एक व्यक्ती आला. त्याने कार थांबवली. तो व्यक्‍ती म्‍हणाला, की “मी पोलीसवाला आहे. मला थोडे पुढे गावात सोडा, माझी मदत करा’, असे म्हणाला. तेव्हा तरुण व त्याच्या मैत्रिणीने त्या व्यक्‍तीला कारमध्ये घेतले.

त्या व्यक्‍तीने सांगितल्यानुसार तरुणाने कार वळवली. वळदगाव शिवारात कार येताच त्या व्यक्‍तीने त्याच्याजवळ असलेली बंदूक दाखवली आणि तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला धमकावले. त्याने गाडी थांबवण्यास सांगितली. त्यानंतर त्या व्यक्‍तीने तुमच्याजवळ जेवढे सोने असेल तेवढे लगेच मला द्या, असे फर्मान सोडले. घाबरलेल्या तरुण आणि त्‍याच्या मैत्रिणीने अंगठी, गळ्यातील सोन्याची चैन, रोख ४ हजार रुपये त्याच्याकडे दिले. त्यानंतर तो व्यक्‍ती वळदगाव शिवारातून पळून गेला. त्याने एकूण ६२ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. तरुणाने सातारा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. भंडारे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!

Latest News

State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!! State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
ऋतुजा पाटील, मुंबई प्रतिनिधी, ‘मेट्रोपोलिस पोस्ट’मुंबई : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होऊनही मीरा-भाईंदरमधील युतीबाबत महायुतीतील घटक पक्षांमध्ये सस्पेन्स कायम आहे....
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
पडेगावमध्ये मनपा ड्रेनेजलाइनच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना, मातीचा ढिगारा अंगावर कोसळून तरुणाचा मृत्यू
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software