कारचालकाने अचानक दरवाजा उघडला, मोपेडवरून जाणारी डॉक्‍टर महिलेसह चिमुकली जखमी, उल्‍कानगरीतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चालकाने उभ्या कारचा दरवाजा अचानक उघडल्याने तिथून मोपेडवर जाणारी डॉक्‍टर महिला व तिची लहान मुलगी जखमी झाली. ही घटना मंगळवारी (२ जुलै) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उल्कानगरीतील आदिनाथ प्रेसिडिओ बिल्डिंगसमोर घडली. डॉ. वृंदा विजय राठी (वय ४७, रा. प्लॉट क्र. सी १०२, ऑगस्ट होम, उल्कानगरी) या त्यांच्या लहान मुलीला मोपेडवर विभागीय […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चालकाने उभ्या कारचा दरवाजा अचानक उघडल्याने तिथून मोपेडवर जाणारी डॉक्‍टर महिला व तिची लहान मुलगी जखमी झाली. ही घटना मंगळवारी (२ जुलै) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उल्कानगरीतील आदिनाथ प्रेसिडिओ बिल्डिंगसमोर घडली.

डॉ. वृंदा विजय राठी (वय ४७, रा. प्लॉट क्र. सी १०२, ऑगस्ट होम, उल्कानगरी) या त्यांच्या लहान मुलीला मोपेडवर विभागीय क्रीडा संकुल येथे खेळण्यासाठी सोडायला निघाल्या होत्या. कारचालकाने (क्र. एमएच २० बीवाय ०४१७) अचानक कारचा दरवाजा उघडला. त्याला धडकून वृंदा व त्‍यांची मुलगी दोघी पडल्या. मुलगी किरकोळ जखमी झाली तर वृंदा यांच्या डाव्या हाताला फॅक्चर झाले. डोक्याला देखील मार लागला. जवाहरनगर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software