करोडीत बहिणीला भेटायला निघालेल्या १९ वर्षीय तरुणाचा दुचाकी घसरून मृत्‍यू; छावणीत रोहित्राला चिकटून मद्यधुंद तरुणाचा मृत्‍यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बहिणीला भेटून घरी परतत असताना १९ वर्षीय तरुणाचा दुचाकी घसरून झाडाला धडकल्याने जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर तालुक्‍यातील करोडी येथे सोमवारी (२३ सप्टेंबर) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. करण विश्वनाथ माळी (वय १९, रा. जोगवाडा, छत्रपती संभाजीनगर) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. करण बहिणीला भेटायला धारखेडा येथे गेला. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बहिणीला भेटून घरी परतत असताना १९ वर्षीय तरुणाचा दुचाकी घसरून झाडाला धडकल्याने जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर तालुक्‍यातील करोडी येथे सोमवारी (२३ सप्टेंबर) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

करण विश्वनाथ माळी (वय १९, रा. जोगवाडा, छत्रपती संभाजीनगर) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. करण बहिणीला भेटायला धारखेडा येथे गेला. घरी परतण्यासाठी सकाळीच निघाला. त्याची दुचाकी करोडी येथे घसरली. तो झाडाला जाऊन धडकला. यात गंभीर जखमी होऊन जागीच मृत्‍यू झाला. घाटी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद घाटी पोलीस चौकीत करण्यात आली आहे.

मद्यधुंद तरुण चिकटला विद्युत रोहित्राला…
महावितरणच्या उच्च दाबाच्या विद्युत रोहित्राला स्पर्श होऊन मद्यधुंद योगेश विजय मगरे (वय २५, रा. छावणी) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (२३ सप्टेंबर) दुपारी छावणीच्या लक्ष्मी कॉलनीत समोर आली. योगेशचे कुटुंब पुंडलिकनगरात राहते. मात्र तो छावणीत राहत होता.

दारू पिण्यासाठी स्वतःच्या अंगावर ब्लेड मारायचा. दुकानदारांकडे दारूसाठी पैसे मागायचा. नेहमी नशेत असायचा. विद्युत रोहित्राला कुंपन असले तरी त्याचे गेट नेहमी उघडे असते. त्‍यातून रविवारी रात्री योगेश कुंपनात गेला आणि रोहित्राला चिकटला. सोमवारी दुपारी काही तरुणांनी तो रोहित्राला चिकटल्याचे पाहून पोलिसांना कळवले. छावणी पोलीस ठाण्याचे अंमलदार रामदास खानेकर अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software