कपिल पिंगळे मर्डर केस : उपसरपंच शिवराम ठोंबरेने रचल्या सुरस कथा, मुरब्बी गुन्हेगाराप्रमाणे पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्‍न

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील लॉज-हॉटेल व्यावसायिक कपिल सुदाम पिंगळे (वय ३१, रा. रांजणगाव शेणपुंजी) याच्या हत्‍याप्रकरणाचा मास्टरमाइंड तथा रांजणगाव शेणपुंजीचा उपसरपंच शिवराम ठोंबरे याची दहा दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. दहा दिवसांच्या चौकशीत वेगवेगळ्या कथा सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचाच प्रयत्न केला. मात्र त्याच्या विरोधात हत्येचा कट रचल्याने सबळ पुरावे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील लॉज-हॉटेल व्यावसायिक कपिल सुदाम पिंगळे (वय ३१, रा. रांजणगाव शेणपुंजी) याच्या हत्‍याप्रकरणाचा मास्टरमाइंड तथा रांजणगाव शेणपुंजीचा उपसरपंच शिवराम ठोंबरे याची दहा दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. दहा दिवसांच्या चौकशीत वेगवेगळ्या कथा सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचाच प्रयत्न केला. मात्र त्याच्या विरोधात हत्येचा कट रचल्याने सबळ पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. दोषारोपत्रात त्याचा सखोल समावेश केला जाणार आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्‍यान, मारेकऱ्यांना थार गाडीतून नांदेडपर्यंत पसार होण्यास मदत करणाऱ्या शिव नंदवंशीची माहिती ठोंबरेने दिलीच नाही. खून होऊन महिना उलटला तरी नंदवंशी पोलिसांच्याही हाती लागलेला नाही. त्‍यामुळे पोलिसांनी वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती, असे स्‍पष्ट करत न्यायालयाने ठोंबरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. कपिलच्या हत्या प्रकरणात रांजणगाव शेणपुंजीचा उपसरपंच शिवराम ठोंबरेला ३ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्याच्या सांगण्यावरूनच जयेश ऊर्फ यश संजय फत्तेलष्कर (वय २४, रा. गोगानाथनगर, बेगमपुरा) याने साथीदारांसोबत मिळून कपिलची हत्‍या केल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलीस कोठडीतील चाैकशीत रचलेला कट अन्‌ कारणांचा उलगडा करण्याचा प्रयत्‍न पोलिसांनी केला. मात्र, शिवराम वेगवेगळ्या कथा, कारणे सांगत राहिला. शिवराम व यश फत्तेलष्करचा संपूर्ण एक दिवस समोरासमोर जबाबही नोंदविण्यात आला. शिवरामने हत्येसाठी प्रोत्साहित करण्यापासून ते पिस्तूल खरेदीसाठी पुरवलेल्या पैशांचा घटनाक्रम समोर आला. कपिलच्या हत्येशी संबंधित आरोपींसह अन्य साक्षीदार, मित्र व कुटुंबातील सदस्य असे जवळपास ३५ जणांचे जबाब तपास अधिकाऱ्यांनी नोंदवले आहेत. हत्या करण्याचे नेमके कारण मात्र शिवरामने अद्यापही उघड केलेले नाही.

काय आहे पिंगळे मर्डर केस…
वाळूज एमआयडीसीतील कोट्यवधी रुपयांच्या अवैध व्यवसायाच्या वर्चस्ववादातूनच कपिलची हत्या शिवराम ठोंबरेने घडवून आणल्याचा संशय आहे. या प्रकरणात सध्या ठोंबरेसह जयेश ऊर्फ यश संजय फत्तेलष्कर (वय २४, रा. गोगानाथनगर, बेगमपुरा), ठोंबरेचा मेहुणा अमर ऊर्फ सोनू शिंदे (वय ३१, रा. जि. जालना), विकास सुरेश जाधव (वय १९, रा. रामनगर, जालना), सागर उर्फ जितसिंग विलास मुळे (वय २३, रा. शनी मंदिराजवळ, जालना) आणि भरत किसन पंडुरे (वय ३३, रा. बेगमपुरा), अमर ऊर्फ अतुल गणेश पवार (४०, रा. हमालपुरा, जालना), अमर ऊर्फ सोनू सुरेश शिंदे (३१, रा. कार्ला, ता.जि. जालना) हे अटकेत आहेत. कपिल व यश हे पूर्वी शिवराम ठोंबरेसाठी काम करत होते. मात्र काही दिवसांपासून कपिल कानाच्या वर जाऊ लागला होता. कपिलचा परिसरातील वाढता वावर व प्रस्थ शिवरामला सहन होत नव्हते.

जालन्याचे अनेक गुन्हेगार यशच्या संपर्कात असतात, याची शिवरामला कल्पना होती. बेगमपुऱ्यातील एका कथित गुंडाचा यशसोबत पूर्वीचा वाद आहे. या गुंडासोबत मिळून कपिल आपल्या दोघांना मारण्याचा कट रचत आहेत, आपला जीव धोक्यात आहे, असे शिवराम जाणूनबुजून यशला सांगू लागला. त्‍यामुळेच यश डोक्‍यात कपिलबद्दल कमालीचा राग निर्माण झाला. तू खून कर, मी पुढे पाहून घेतो, असे शिवरामने यशला सांगितले होते. वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटीत १९ जुलैला पहाटे साईबाबा चौकात कपिल सुदाम पिंगळे (वय ३३, रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी) याचा मृतदेह आढळला होता. कपिलला यशने गुरुवारी रात्री भेटायला बोलावले.

कपिलसोबत यश व त्‍याच्‍या ३ मित्रांनी एका हॉटेलमध्ये जेवण केले. मध्यरात्री कपिलला घरी सोडण्याचा बहाणा करून रांजणगावच्या दिशेने कारमधून सारे निघाले. कारमध्ये सुपारी दिल्याच्या कारणावरून यशने कपिलसोबत वाद सुरू केला. विकासने कपिलला मारहाण केली. यशने त्‍याच्‍याजवळ असलेल्या गावठी पिस्‍तुलाने कपिलच्या खांद्याजवळ गोळी झाडली, तर सागरने चाकूने कपिलवर १७ वार केले. मोठा रक्‍तस्‍त्राव होऊन कपिल कारमध्येच निपचित पडला. तो मरण पावल्याची खात्री झाल्यावर चौघांनी वडगाव कोल्हाटीच्या खदानीजवळ मृतदेह टाकून दिला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software