- News
- सिटी क्राईम
- कपिल पिंगळेच्या खुनाचा सूत्रधार निघाला उपसरपंच शिवराम ठोंबरे!; त्यानेच सुपारी दिल्याची मारेकऱ्यांची...
कपिल पिंगळेच्या खुनाचा सूत्रधार निघाला उपसरपंच शिवराम ठोंबरे!; त्यानेच सुपारी दिल्याची मारेकऱ्यांची कबुली…
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रांजणगाव शेणपुंजीतील देवगिरी कॉलनीतील रहिवासी हॉटेलचालक कपिल सुदाम पिंगळे (वय ३३, रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी) याच्या हत्येचा सूत्रधार उपसरपंच शिवराम हरिभाऊ ठोंबरे (रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंंजी) हाच असल्याचे समोर आले आहे. त्याच्या सांगण्यावरूनच कपिलचा काटा काढल्याचे मारेकऱ्यांनी कबूल केले आहे. मारेकऱ्यांना पळून जाण्यात मदत करणाराही एक जण असून, […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रांजणगाव शेणपुंजीतील देवगिरी कॉलनीतील रहिवासी हॉटेलचालक कपिल सुदाम पिंगळे (वय ३३, रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी) याच्या हत्येचा सूत्रधार उपसरपंच शिवराम हरिभाऊ ठोंबरे (रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंंजी) हाच असल्याचे समोर आले आहे. त्याच्या सांगण्यावरूनच कपिलचा काटा काढल्याचे मारेकऱ्यांनी कबूल केले आहे. मारेकऱ्यांना पळून जाण्यात मदत करणाराही एक जण असून, त्याचे नाव शिव नंदवंशी आहे. त्यालाही पोलीस शोधत आहेत. ठोंबरे आणि नंदवशीच्या शोधासाठी ३ वेगवेगळी पथके मागावर लावण्यात आली आहे.
मारेकरी जयेश उर्फ यश संजय फत्तेलष्कर (वय २४, रा. बेगमपुरा), विकास सुरेश जाधव (वय १९, रा. रामनगर, जालना), सागर उर्फ जितसिंग विलास मुळे (वय २३, रा. शनी मंदिराजवळ, जालना) आणि भरत किसन पंडुरे (वय ३३, रा. बेगमपुरा), अमर ऊर्फ अतुल गणेश पवार (४०, रा. हमालपुरा, जालना) यांची पोलीस कोठडी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी १ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.
वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटीत १९ जुलैला पहाटे साईबाबा चौकात कपिलचा मृतदेह आढळला होता. कपिल मूळचा नांदेड जिल्ह्यातील कारेगावचा (ता. धर्माबाद) आहे. कपिलचे वडील रोजगारासाठी वाळूज एमआयडीसीत येऊन पुढे रांजणगाव शेणपुंजीत स्थायिक झाले होते. कपिलचे लॉज- हॉटेल आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असायचा. कपिलची हॉटेल काही दिवसांपासून बंद होती. कपिलला यशने गुरुवारी रात्री भेटायला बोलावले. कपिलसोबत यश व त्याच्या ३ मित्रांनी एका हॉटेलमध्ये जेवण केले.
मध्यरात्री कपिलला घरी सोडण्याचा बहाणा करून रांजणगावच्या दिशेने कारमधून सारे निघाले. कारमध्ये सुपारी दिल्याच्या कारणावरून यशने कपिलसोबत वाद सुरू केला. विकासने कपिलला मारहाण केली. यशने त्याच्याजवळ असलेल्या गावठी पिस्तुलाने कपिलच्या खांद्याजवळ गोळी झाडली, तर सागरने चाकूने कपिलवर १७ वार केले. मोठा रक्तस्त्राव होऊन कपिल कारमध्येच निपचित पडला. तो मरण पावल्याची खात्री झाल्यावर चौघांनी वडगाव कोल्हाटीच्या खदानीजवळ मृतदेह टाकून दिला. कपिल व यश दोघेही गुन्हेगार होते. वाळूज एमआयडीसीतील अवैध धंद्यातील वर्चस्ववादातून हा खून झाल्याचे आजवरच्या तपासात समोर आले आहे.

